India vs England : इंग्लंडनं पुन्हा उप कर्णधार बदलला; पाचव्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनसाठी दोन खेळाडूंमध्ये होणार टॉस!

India vs England 5th Test : चौथ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघावर मालिका वाचवण्याची टांगती तलवार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:21 PM2021-09-08T16:21:55+5:302021-09-08T16:22:21+5:30

whatsapp join usJoin us
India vs England : Jos Buttler will be the vice-captain and wicket-keeper for England in the 5th Test against India | India vs England : इंग्लंडनं पुन्हा उप कर्णधार बदलला; पाचव्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनसाठी दोन खेळाडूंमध्ये होणार टॉस!

India vs England : इंग्लंडनं पुन्हा उप कर्णधार बदलला; पाचव्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनसाठी दोन खेळाडूंमध्ये होणार टॉस!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test : चौथ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघावर मालिका वाचवण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. १० सप्टेंबरपासून मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याचा इंग्लंडचा मानस आहे. इंग्लंडनं पाचव्या कसोटीसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे आणि मँचेस्टर येथील सामन्यात त्यांनी उप कर्णधार पुन्हा बदलला. 

टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२०तही वर्चस्व गाजवणार; इंग्लंड दौऱ्यावरील वेळापत्रक जाहीर

या संपूर्ण मालिकेत इंग्लंडचा संघ जो रूट याच्या फलंदाजीवरच अवलंबून असलेला पाहायला मिळाला. फलंदाजांचे अपयश हे इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. रोरी बर्न्स व हसीब हमीद ही सलामीची जोडी ही इंग्लंडसाठी चौथ्या कसोटीतील सकारात्मक बाब म्हणावी लागले. मुलीच्या जन्मासाठी चौथ्या कसोटीतून विश्रांती घेणारा जोस बटलर पुन्हा संघात परतला आहे, तर सॅम बिलिंग हा पुन्हा कौंटी क्लब केंटसाठी खेळण्यास रवाना झाला आहे. इंग्लंडनं फिरकीपटू जॅक लिच याला पाचारण केले आहे.  

पाचव्या कसोटीत जोस बटलर खेळणार असल्याचे स्पष्ट करताना त्याच्याकडे उप कर्णधारपद दिले गेले आहे, असे कर्णधार जो रूटनं स्पष्ट केले. चौथ्या कसोटीत ही जबाबदारी मोईन अलीकडे होती. अली हाही पाचवी कसोटी खेळेल, हेही रूटनं सांगितलं. ( Joe Root confirms that Jos Buttler will return to England's team for the final Test as vice-captain and wicket-keeper) दरम्यान, मधल्या फळीत ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांच्यात टॉस होण्याची शक्यता आहे. पोपनं चौथ्या कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. 


इंग्लंडचा संघ - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेंन्स, जॅक लिच, डेवीड मलान, क्रेग ओव्हर्टन, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड ( England squad for the 5th Test vs India:  Joe Root Moeen Ali, James Anderson, Jonathan Bairstow, Rory Burns, Jos Buttler, Sam Curran, Haseeb Hameed, Dan Lawrence, Jack Leach, Dawid Malan, Craig Overton, Ollie Pope, Ollie Robinson, Chris Woakes, Mark Wood.) 

Web Title: India vs England : Jos Buttler will be the vice-captain and wicket-keeper for England in the 5th Test against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.