IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

India vs England T20I series: इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:25 AM2021-03-09T11:25:05+5:302021-03-09T11:25:42+5:30

whatsapp join usJoin us
India vs England T20I series: Squads, schedule, venue, telecast, live streaming - All you need to know | IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड दौऱ्याची मालिका दुसऱ्या टप्प्यात आली आहे. टीम इंडियानं कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवून इंग्लंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम सामन्याच्या शर्यतीतून ब बाद केले. इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. १२ मार्चपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठीचे सर्व खेळाडू टीम इंडियाच्या ताफ्यात आधीच दाखल झाले आहेत, तर इंग्लंडचेही ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. IPL 2021 : मुंबईत रोज ७ -८ हजार कोरोना रुग्ण सापडतात, तरीही तिथे सामने खेळवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका! 

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडची येथेही कसोटी लागणार. त्यात इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे मालिकेला मुकणार असल्याचे वृत्तही समोर येत आहे. ( schedule, squads, fixtures, telecast and streaming details of the five T20Is ) आशिया चषक स्पर्धेत लोकेश राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व; BCCI टीम B मैदानावर उतरवणार, जाणून घ्या Playing XI

वेळापत्रक ( Schedule )
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Ahmedabad's Narendra Modi Stadium) हे पाचही सामने खेळवण्या येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने खेळवण्यात येतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल.


 

संघ ( Squads ) 
भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

इंग्लंड - इयॉन मॉर्गन, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन,  लाएम प्लंकेट, डेवीड मलान, आदील रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, मार्क वूड, जॅक बॉल, मॅट पर्किसन

थेट प्रक्षेपण ( Telecast and streaming) - स्टार स्पोर्ट्स वाहिनी, हॉटस्टार व जिओ टीव्ही 
 

Web Title: India vs England T20I series: Squads, schedule, venue, telecast, live streaming - All you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.