IND Vs NZ, 1st ODI : 11 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास, हा विक्रम आहे खास

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:45 AM2020-02-05T10:45:48+5:302020-02-05T10:52:28+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, 1st ODI: After 2009 Two century stands for India in a same ODI in New Zealand | IND Vs NZ, 1st ODI : 11 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास, हा विक्रम आहे खास

IND Vs NZ, 1st ODI : 11 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास, हा विक्रम आहे खास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली. पण, या दोघांनाही मोठी खेळी साकारण्यात अयपश आलं. कोहलीनं श्रेयस अय्यरसोबत आणि श्रेयसनं लोकेश राहुलसोबत अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी आश्वासक भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. या तिघांनी 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती आज केली.

वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. पण, आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूनं ही जोडी तोडली. कॉलीन डी ग्रँडहोमनं पृथ्वीला ( 20) यष्टिरक्षक टॉम लॅथम करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पुढच्याच षटकात मयांकही माघारी परतला. टीम साउदीच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या टॉम ब्लंडेल यानं अप्रतिम झेल टीपत मयांकला ( 32) तंबूत जाण्यास भाग पाडले. 

कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. अय्यरला नशीबानं साथ दिली हेही तितकंच खरं. त्याचे दोन झेल किवी फलंदाजांनी सोडले. त्यानंतर श्रेयसने बचावात्मक खेळ केला आणि कोहली दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत होता. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची सरासरी सहाच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. विराटनं वन डेतील 58 वे अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. विराटनं 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह विराटनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली. 

विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी इश सोढीनं सुंपष्टात आणली. 29व्या षटकातील चौथा चेंडू मॅजिकल ठरला. सोढीनं टाकलेल्या त्या चेंडूनं विराटच्या बॅट-पॅडमधून वाट काढत यष्टिंचा वेध घेतला. विराटही काही काळ हतबल झालेला पाहायला मिळाला. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला. खेळपट्टीवर तग धरलेल्या श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्यानं 7वे वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाला मजबूत स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसनं काही उत्तुंग षटकारही खेचले. त्यानं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. 

खेळपट्टीवर स्थावरल्यानंतर लोकेशनंही आपला इंगा दाखवला. त्यानं टीम साउदीच्या एकाच षटकात लागोपाठ दोन खणखणीत षटकार खेचले. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये श्रेयस आणि लोकेशनं तुफान फटकेबाजी केली. 84 धावांवर असताना श्रेयसचा झेल सोडण्याची चुक कॉलीन डी ग्रँडहोमनं केली. श्रेयस आणि लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली. श्रेयस आणि लोकेशच्या शतकी भागीदारीनं 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली. 

काय घडलं होतं 2009 साली?
8 मार्च 2009 मध्ये ख्राईस्टचर्च येथे झालेल्या सामन्यात भारतानं 58 धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 392 धावा चोपल्या, प्रत्युत्तरात किवींचा संपूर्ण संघ 334 धावांत तंबूत परतला होता. या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं 163 धावांची वादळी खेळी केली होती. त्याला युवराज सिंगनं 87, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 68 धावा करून चांगली साथ दिली. सचिन आणि युवराज यांनी 138 धावा जोडल्या, तर सचिन आणि धोनी यांनी नाबाद 135 धावांची भागीदारी केली. त्यानंतर 2020मध्ये न्यूझीलंडमध्ये एकाच सामन्यात दोन शतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
 

IND Vs NZ, 1st ODI : पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल जोडीनं 1976नंतर न्यूझीलंडमध्ये घडवला पराक्रम

U19WC: पाणीपुरी विकून क्रिकेटचे धडे गिरवणारा 'यशस्वी' मुंबईकर जेव्हा पाकची धुलाई करतो...

Web Title: India vs New Zealand, 1st ODI: After 2009 Two century stands for India in a same ODI in New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.