भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्वेंटी-20 मालिकेतील अपयश विसरून न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. त्यांनी जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीम इंडियावर निर्भेळ यश मिळवलं. न्यूझीलंडनं तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी जिंकून भारताला व्हाईटवॉश दिला
02:06 PM
पुढच्याच षटकात शार्दूल ठाकूरनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं हेन्री निकोल्सला बाद केले. निकोल्सनं 103 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावा केल्या.
01:59 PM
निकोल्स आणि केन यांची अर्धशतकी भागीदारी चहलनं संपुष्टात आणली. केन 22 धावा करून माघारी परतला. पहिल्या दोन सामन्यांत तुफान फटकेबाजी करणारा रॉस टेलरही स्वस्तात माघारी परतला. रवींद्र जडेजानं त्याला कोहलीकरवी झेलबाद केले.
12:57 PM
17व्या षटकात युजवेंद्र चहलनं टाकलेल्या अप्रतिम चेंडूंनं गुप्तीलच्या यष्टिंचा वेध घेतला. गुप्तील 46 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावांवर माघारी परतला.
12:51 PM
12व्या षटकात अर्धशतकवीर मार्टीन गुप्तीलला धावबाद करण्याची संधी लोकेश राहुलनं दवडली. त्यामुळे या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचे रुपांतर शतकात केले. न्यूझीलंडनं 15व्या षटकात शतकी पल्ला पार केला.
12:38 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना पहिल्या दहा षटकांत एकही विकेट न गमावता 65 धावा करून दिल्या. 12व्या षटकात अर्धशतकवीर मार्टीन गुप्तीलला धावबाद करण्याची संधी लोकेश राहुलनं दवडली.
11:23 AM
11:03 AM
वन डे क्रिकेटमधील हे त्याचे चौथे शतक ठरले. या शतकासह त्यानं विराट कोहलीचा विक्रम मोडला. सर्वात कमी डावांमध्ये चार वन डे शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांत लोकेशनं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं 31 डावांमध्ये हा पराक्रम केला. शिखर धवन ( 24 डाव ) अव्वल स्थानी आहे. कोहलीला चार शतकं झळकावण्यासाठी 36 डाव खेळावे लागले होते. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला.
10:46 AM
केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह अर्धशतकी भागीदारी केली. भारतानं 40 षटकांत दोनशेचा पल्ला गाठून पाचची सरासरी कायम राखली होती. लोकेश राहुलनं शतक पूर्ण करताना आगळ्या वेगळ्या पंक्तीत स्थान पटकावले. आशियाई देशांबाहेर पाचव्या क्रमांकावर शतक झळकावणारा लोकेश तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी युवराज सिंगन ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे आणि सुरेश रैनानं न्यूझीलंड व इंग्लंड येथे अशी कामगिरी केली आहे.
10:26 AM
केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह अर्धशतकी भागीदारी केली. भारतानं 40 षटकांत दोनशेचा पल्ला गाठून पाचची सरासरी कायम राखली होती.
09:56 AM
09:43 AM
लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या.
09:33 AM
लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली. श्रेयसनं मालिकेतील फॉर्म कायम राखताना सलग तिसऱ्यांदा 50+ खेळी केली. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन वन डे सामन्यांत 50+ खेळी करणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं अशी कामगिरी केली होती.
09:17 AM
लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली.
08:35 AM
तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते.
08:01 AM
भारताला दुसरा धक्का; कोहली ९ धावा काढून माघारी
07:53 AM
पाच षटकांनंतर भारताच्या १ बाद २५ धावा; पृथ्वी शॉ १६, तर विराट कोहली ८ वर नाबाद
07:41 AM
भारताला पहिला धक्का; मयंक अगरवाल बाद
07:06 AM
केदार जाधव संघाबाहेर; मनीष पांडेला संधी
07:04 AM
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करणार
Web Title: India Vs New Zealand 3rd ODI Live Score Updates IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.