भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात मोहम्मद शमीनं यजमानांच्या तोंडचा घास पळवला. न्यूझीलंडला निर्धारित षटकात 9 धावांची गरज होती. शमीच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरनं षटकार खेचून टीम इंडियाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. पण, त्यानंतर शमीनं पाच चेंडूवर केवळ दोन धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे किवींना 6 बाद 176 धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यात रोहितनं अखेरच्या दोन चेंडूवंर षटकार खेचून भारताला थरारक विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयावर क्रिकेटपटूंसह अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर कौतुक केलं. पण, त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच ट्विट खास ठरलं.
IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर
सुपर ओव्हरचा थरार
जसप्रीत बुमराहच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्यानंतर केन विलियम्सननं पुढील दोन चेंडूवर षटकार व चौकार खेचला. त्यानंतर एक धाव घेत मार्टीन गुप्तील स्ट्राईकवर आला आणि अखेरच्या चेंडूवर त्यानं चौकार खेचून टीम इंडियासमोर विजयासाठी 18 लक्ष्य ठेवले.
भारताकडून रोहित शर्मा व लोकेश राहुल फलंदाजीला आले. पहिल्याच चेंडूवर रोहित धावबाद होता होता वाचला. पहिल्या दोन चेंडूवर रोहितनं तीन धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर लोकेशनं चौकार मारला. त्यामुळे भारताला 3 चेंडूंवर 11 धावांची गरज होते. चौथ्या चेंडूवरील एका धावेनं सामन्यातील चुसर आणखी वाढवली. रोहितनं षटकार खेचून सर्व दडपण कमी केले. 1 चेंडू 4 धावा असा सामना रंजक बनवला. रोहितनं षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला.
IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम
IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय
IND Vs NZ: सुपर ओव्हरवर बंदी आणा, न्यूझीलंडच्या क्रीडा मंत्र्यांनी केली अजब मागणी
Web Title: India vs New Zealand, 3rd T20I : Big B amitabh Bachchan and virender sehwag congratulate team India for their Super win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.