IND vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मानं मोडला सचिन तेंडुलकरचा unique विक्रम

India vs New Zealand, 3rd T20I : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 03:07 PM2020-01-29T15:07:08+5:302020-01-29T16:58:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, 3rd T20I: Rohit Sharma surpasses Sachin Tendulkar to achieve a unique record during Hamilton T20I | IND vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मानं मोडला सचिन तेंडुलकरचा unique विक्रम

IND vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मानं मोडला सचिन तेंडुलकरचा unique विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला. त्यानं लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करताना संघाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर विराट कोहलीनं तळाला फटकेबाजी करताना संघाला 5 बाद 179 धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात रोहितनं 40 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 65 धावा चोपल्या. रोहितनं या सामन्यात सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. त्यानं 219 डावांमध्ये हा पल्ला पार केला आणि अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये 50+ सरासरी असलेला रोहित हा एकमेव फलंदाज आहे.

रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 10000 धावांचा पल्लाही सर केला. वीरेंद्र सेहवाग ( 16119), सचिन तेंडुलकर ( 15335), सुनील गावस्कर ( 12258) यांच्यानंतर हा पल्ला गाठणारा रोहित चौथा भारतीय, तर एकूण 21वा सलामीवीर ठरला. पण, रोहितची सरासरी ही 50+ इतकी आहे. या सरासरीसह त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा unique विक्रम मोडला. माजी फलंदाज तेंडुलकरनं 48.07च्या सरासरीनं हा पल्ला सर केला होता. तेंडुलकरनं 342 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सलामीवीर म्हणून 15335 धावा केल्या आहेत. 

IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय

... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर

IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?

U19WC: कामगाराच्या मुलाची कमाल, टीम इंडियाच्या विजयाच उचलला सिंहाचा वाटा

नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट  

Breaking : सायना नेहवालचा भाजपात प्रवेश

 

Web Title: India vs New Zealand, 3rd T20I: Rohit Sharma surpasses Sachin Tendulkar to achieve a unique record during Hamilton T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.