न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान

टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना नवा इतिहास रचणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:46 AM2024-10-26T10:46:14+5:302024-10-26T10:47:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand Day 3 2nd Test Jadeja runs out O’Rourke to bundle out New Zealand India needs 359 to win | न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान

न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळातील तासाभरातच न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपला आहे. दुसऱ्या डावात केलेल्या २५५ धावांसह न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. पुण्याच्या खेळपट्टीवर हे आव्हान खूप मोठे आहे. टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना नवा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने ५ बाद १९८ धावांवरून डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. टॉम बंडेल ४१ धावांवर बाद झाला. रवींद्र जाडेजानं टीम इंडियाला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर काही वेळातच जड्डूनं मिचेल सँटनरलाही ४ धावांवर चालते केले. साउदीला अश्विननं खातेही उघडू दिले नाही. एजाज पटेलच्या रुपात जड्डूनं आपल्या खात्यात तिसरी विकेट जमा केली. तो अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. विल्यम ओ'रुर्कला रन आउट करत टीम इंडियाने दुसऱ्या डावात  न्यूझीलंडला २५५ धावांत रोखले. ग्लेन फिलिप्स ८२ चेंडूत ४८ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: India vs New Zealand Day 3 2nd Test Jadeja runs out O’Rourke to bundle out New Zealand India needs 359 to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.