जगातील अव्वल संघ टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत अपयश पत्करावे लागले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांवर टीम इंडियाचे शिलेदार अपयशी ठरले. 2019चा शेवट कसोटी मालिकेत अपराजित राहण्यानं केल्यानंतर 2020च्या पहिल्याच कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच व्हाईटवॉश ठरला. मायदेशात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाची परदेशात उडालेली भंबेरी पाहून सर्वांनाच धक्का बसला.
टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन
विराट कोहलीचा फॉर्म हा या मालिकेत सर्वात चर्चिला गेलेला विषय ठरला. विराटनं कसोटी मालिकेत चार डावांमध्ये केवळ 38 धावाच केल्या, तर या संपूर्ण मालिकेत त्याच्या नावावार 218 धावाच राहिल्या. या दौऱ्यानंतर कोहलीनं संघातील कमकुवत बाबींवर भाष्य करताना सर्वांचे कान टोचले. मात्र, त्याचं एक विधान सध्या नव्या वादाला तोंड फोडणारं ठरू शकतं.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार कोहली सहकाऱ्यांना सांगत होता की, जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब दिखा दूंगा. ( भारत दौऱ्यावर आल्यावर न्यूझीलंडला दाखवू देऊ.)'' कोहलीच्या या विधानाची सध्या जास्त चर्चा आहे आणि त्यानं असं काही विधान केले असल्यास त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते. कोहलीनं हे भाष्य केलं की नाही, याबाबत अजून अधिकृत माहीती मिळालेली नाही. पण, त्यानं रागात असं वक्तव्य केलं, असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली; म्हणाला...
या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार कोहली पत्रकारावर चांगलाच भडकला. या सामन्यात कोहलीच्या आक्रमकतेचीही चर्चा रंगली. केन विलियम्सन बाद झाल्यानंतर कोहलीनं ज्या पद्धतीनं प्रेक्षकांकडे पाहून अपशब्द वापरले आणि जल्लोष केला, त्यावर टीका झाली. पत्रकाराने त्याबाबत कोहलीला प्रश्न विचारला.
- पत्रकार - केन विलियम्सन बाद झाल्यानंतर त्याला आणि प्रेक्षकांना डिवचण्याच्या तुझ्या कृतीबाबत तू काय सांगशील? एक कर्णधार म्हणून तुला एक आदर्श ठेवायला हवा, असं वाटत नाही का?
- कोहली - तुम्हाला काय वाटतं?
- पत्रकार - मी तुला प्रश्न विचारला आहे?
- कोहली - मैदानावर नेमकं काय घडलं हे तू जाणून घ्यायला हवं आणि त्यानंतर प्रश्न विचारायला हवा. त्रोटक माहीती घेऊन मला प्रश्न विचारणे चुकीचे आहे. आणि हो तुला विवाद निर्माण करायचा आहे, तर ही योग्य जागा नाही. मी मॅच रेफरींसोबत चर्चा केली, त्यांना या प्रकरणात काहीच चुकीचे वाटले नाही. धन्यवाद.
2018च्या इंग्लंड दौऱ्यातही 4-1 अशा फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला होता आणि त्याहीवेळेस कोहलीचा पारा चढला होता.
न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!
Web Title: India vs New Zealand : 'Jab India mein yeh log aayengey, tab dikha doonga,' virat Kohli's pep talk with teammates sparks uproar svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.