भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवात विराट कोहलीच्या संघांना दणक्यात केली. 204 धावांचे लक्ष्य समोर असूनही टीम इंडियानं 6 विकेट व 6 चेंडू राखून विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. सर्वकाही टीम इंडियाच्या बाजूनं असताना एका गोष्टीनं विराट कोहलीची चिंता वाढवली आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहित शर्मा ( 7) झटपट माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराटनं किवी गोलंदाजांचा समाचार घेतला. राहुलनं 27 चेंडूंत 56 धावा केल्या, तर कोहलीनं 32 चेंडूंत 45 धावा करताना दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरनं 29 चेंडूंत 58 धावा करताना टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारतीय फलंदाजांनी मालिकेत सकारात्मक सुरुवात केली असली तरी किवी गोलंदाजांनीही टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार गेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मुन्रोनं 42 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचताना 59 धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सननं 26 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 51, तर रॉस टेलरनं 27 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 54 धावा चोपल्या. या खेळींच्या जोरावर किवींनी 5 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला.
पण, न्यूझीलंडच्या डावाच्या अखेरच्या षटकात टीम इंडियाच्या चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा पाच मुरगळला. त्यामुळे त्याला वेदनेसह काही काळ मैदानावरच बसलेला चाहत्यांनी पाहिला. दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या बुमराहला पुन्हा दुखापत झाल्यानं टीम इंडियात चिंतेचे वातावरण आहे.
पाहा व्हिडीओ...
सामन्यानंतर बुमराहला त्वरीत स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्या वैद्यकीय अहवालानंतर तो रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.
IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम
...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान
बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान
श्रेयस अय्यर भविष्यातील मोठा फलंदाज
Web Title: India vs New Zealand : Jasprit Bumrah twists ankle during first T20I against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.