भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहित शर्माचा खेळ कसा होतो, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रोहितनं सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळ करताना चाहत्यांना खुश केलं. हिटमॅन रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सॉलिड सुरुवात करताना दी वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1998मध्ये द्रविडनं केलेल्या विक्रमाची रोहितनं पुनरावृत्ती केली. येथेच तो थांबला नाही. त्यानं कसोटीत सलामीला येण्याच्या संधीचं सोनं करताना खणखणीत शतकही झळकावलं.
रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा 50+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत 82, 51*, 102*, 65, 50*, 59*( आजची खेळी) पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. द्रविडनं 1997-98 या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा 50+ धावा केल्या होत्या. या अर्धशतकामुळे रोहितचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्यानं त्याचं शतकात रुपांतर केले.
रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.
यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.
Web Title: India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma became a fourth Indian who scored century in the maiden test innings as an opener
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.