मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेवरील आपली पकड मजबूत केलीये. दक्षिण आफ्रिका फक्त मालिका वाचवू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:02 AM2024-11-14T01:02:42+5:302024-11-14T01:08:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 3rd T20I IND beats SA by 11 runs leads series 2-1 | मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 3rd T20I Match Result : सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात २०० पारच्या लढाईत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला रोखून बाजी मारली. या सामन्यातील विजयासह भारतीय संघानं ४ सामन्यांच्या टी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघच ही मालिका जिंकू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फक्त बरोबरीचीच संधी आहे. 

शेवटच्या षटकात मार्कोची फटकेबाजी, पण...

पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २१९ धावा करत यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर २२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात मार्को यान्सेन यानं दक्षिण आफ्रिकेकडून दुसरी फास्टर फिफ्टी मारली. त्याने सामन्यात थोडी रंगत निर्माण केली. पण शेवटी भारतीय संघानंच बाजी मारली. ११ धावांनी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेक़डून मार्को यान्सेन याने १७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्याशिवाय क्लासेन याने २२ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. 

टीम इंडियाकडून शर्माजी अन् वर्माजीनं केली हवा

सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन खातेही न उघडता तंबूत परतला.  त्यानंतर बढती मिळालेल्या तिलक वर्मानं सलामीवीर अभिषेक शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. २५ चेंडूत ५० धावा करून अभिषेक शर्मा बाद झाला. केश महाराजनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा शेवटपर्यंत थांबला. ५६ चेंडूत त्याने केलेल्या नाबाद १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २१९ धावा केल्या.

बॅटिंगमध्ये सूर्यासह हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो

सूर्यकुमार यादव अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत परतला. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूत १८ धावा केल्या. रिंकू सिंहनं १३ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या रमनदीपनं षटकार मारून खाते उघडले . ६ चेंडूत १५ धावांवर असताना तो रनआउटच्या रुपात बाद झाला. अक्षर पटेलनं नाबाद १ धाव केली. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले सिमेनेल आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन याच्या खात्यात एक विकेट जमा झाली.    

भारताकडून अर्शदीप ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज


भारतीय संघाने दिलेल्या २२० या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील प्रत्येक बॅटरनं दुहेरी आकडा गाठला. पण मार्कोच यान्सेनचं अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनची ४१ धावांची क्लास खेळी सोडली तर अन्य कुणालाही मोठी खेळी करता आली नाही.  भारताकडून अर्शदीप सिंगनं सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. हार्तिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

 

 

Web Title: India vs South Africa 3rd T20I IND beats SA by 11 runs leads series 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.