India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:34 PM2019-09-26T12:34:09+5:302019-09-26T12:35:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, Test : Going to Give Rohit Time at Top of the Order - Shastri | India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती रोहित शर्माच्या ओपनिंगची. ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमध्ये रोहित हा भारताचा प्रमुख सलामीवीर आहे, परंतु कसोटीत रोहित 5 किंवा 6 व्या क्रमांकावर येतो. मात्र, आता कसोटीतही त्याला ओपनिंगची संधी मिळणार आहे. त्याच्या या संधीबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मोठं विधान केलं आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितची कामगिरी लक्षात घेऊनच 2013मध्ये त्याला ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली. पण, कसोटीत त्याच्याकडून तशाच कामगिरीच लगेच अपेक्षा केली जाऊ नये. कसोटीत रोहितला ओपनिंगला पाठवण्याबाबत शास्त्री म्हणाले,''मुंबईसाठी सलामीला खेळायला सुरुवात कर असा सल्ला मी रोहितला 2015-16मध्ये दिला होता. त्याच्याकडे तो X फॅक्टर आहे, परंतु 5 व्या किंवा 6व्या क्रमांकावरून थेट सलामीला खेळणं तितकं सोपं नाही. रोहित या नव्या जबाबदारीत यशस्वी होईल आणि त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याची आमची तयारी आहे''


यावेळी शास्त्रींनी त्यांचा स्वतःचा अनुभवही सांगितला. ''रोहितला 2015 साली सलामीला येण्याचा सल्ला देण्यामागे एक कारण होते. मला आलेल्या अनुभवातून तो सल्ला दिला होता. भारतासाठी सलामी करणारे अनेक खेळाडू आहेत, पण ते फक्त फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी करू शकणारे मोजकेच आहेत. मायदेशात खेळताना तुम्हाला काही वेळेस पाच फलंदाजांसहच खेळावे लागते. मला सलामीला खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य,''असे शास्त्रींनी सांगितले. 


विरेंद्र सेहवाग सलामीला येण्यापूर्वी त्याच्याशी मारलेल्या गप्पांचा किस्साही शास्त्रींनी सांगितला. ते म्हणाले,'' वेस्ट इडिंज दौऱ्यात संघाच्या गेटटुगेदरमध्ये मी सेहवागला भेटलो होते. तेव्हा मी त्याला कसोटीत सलामीला खेळण्याबाबत विचारले होते आणि त्याबाबत मी त्याच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. ही तुझ्यासाठी सर्वोत्तम क्रमवारी आहे, असे मी त्याला सांगितले होते. त्यानंतर जो इतिहास घडला, तो सर्वांनाच माहित आहे. एका महिन्यानंतर त्यानं इंग्लंडविरुद्ध ओपनिंग केली.'' 

 

Web Title: India vs South Africa, Test : Going to Give Rohit Time at Top of the Order - Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.