Join us  

IND vs SA  Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला

भारतीय संघ २००७ नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतुर आहे, तर दक्षिण आफ्रिकेला पहिलावहिला वर्ल्ड कप खुणावतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:31 PM

Open in App

IND vs SA Live Scorecard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी व्यासपीठ सजलं आहे... बार्बाडोसमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे आणि निळ्याशार आकाशाखाली हिरवळीने नटलेले केनसिंग्टन ओव्हल सुंदर दिसत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका संघाचे चाहत्यांची पाऊलं हळुहळू मैदानाच्या दिशेने वळताना दिसत आहेत... भारतीय संघ २००७ नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतुर आहे, तर दक्षिण आफ्रिकेला पहिलावहिला वर्ल्ड कप खुणावतोय.. Ind vs SA Live match final

IND vs SA Live Score Board: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची ही टीम इंडियासोबत शेवटची स्पर्धा आहे आणि रोहित अँड कंपनी त्याला विजयी निरोप देण्यासाठी सज्ज आहे. रोहित व विराट कोहली या सीनियर खेळाडूंचा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, त्यांनाही जेतेपदाचा चषक खुणावतोय. दोन्ही संघ या संपूर्ण प्रवासात अपराजित राहिल्याने फायनलमध्ये बाजी कोण मारेल, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. आज खेळपट्टीवर गवत दिसत नसल्याने फलंदाजीसाठी पोषक मानली जात आहे. ही खेळपट्टी १८० धावांची असल्याचे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आणि टॉस जिंकून फलंदाजी घेणे योग्य ठरेल असे म्हटले. Ind vs SA Live scorecard 

Sa vs Ind live t20 wc  match final मागच्या वेळेस २०२२ मध्ये दोन्ही संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भिडले होते, तेव्हा आफ्रिकेने ५ विकेट्सने बाजी मारली होती. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉस जिंकणारा संघ आतापर्यंत ७ वेळा जिंकला आहे.  रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघात कोणताच बदल केलेला नाही. रोहित सहकाऱ्यांना म्हणाला, "वैयक्तिक भूमिका समजून घ्या. शांत रहा आणि एखाद्या आघाडीच्या संघाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याप्रमाणे खेळा. फक्त शांत आणि संयमी राहा. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत खरोखर चांगले क्रिकेट खेळले आहे, आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो आहे." 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मा