Join us  

IPL 2025 : आता Dinesh Karthik RCB ला 'मार्ग' दाखवणार; फ्रँचायझीची मोठी घोषणा, दिसणार नव्या भूमिकेत

Dinesh Karthik Latest News : दिनेश कार्तिकची नवी इनिंग.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:33 AM

Open in App

Dinesh Karthik Retirement : आयपीएल २०२४ चा हंगाम दिनेश कार्तिकसाठी खेळाडू म्हणून अखेरचा ठरला. आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच तो आयपीएलमधून निवृत्त झाला. पण, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने एक मोठी घोषणा करत कार्तिकवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल २०२५ मध्ये कार्तिक आरसीबीच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत असेल. अलीकडेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. 

भारतासाठी १८० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कार्तिकने ३४६३ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने यष्टीरक्षक म्हणून १७२ फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो हिस्सा राहिला आहे. २००७ मध्ये कार्तिक भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. १५ वर्षांच्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकच्या वाटेत अनेक चढ-उतार आले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १०२५ धावा केल्या आहेत. याशिवाय ९४ वन डे सामन्यांमध्ये त्याने १७५२ धावा केल्या. तसेच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कार्तिकने ६० सामन्यांत ६८६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट वगळता एकदाही कार्तिकला शतकी खेळता आली नाही. 

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकिर्द १७ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिकला केवळ एका हंगामात ५०० हून अधिक धावा करता आल्या. त्याने २०१३ मध्ये मुंबईकडून खेळताना ही किमया साधली होती. पहिल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाल्याने कार्तिकला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळला. दिनेश कार्तिक दिल्ली डेयरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सहा संघाकडून खेळला आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण २५७ सामने खेळले असून, ४८४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २२ अर्धशतके झळकावता आली.  

टॅग्स :दिनेश कार्तिकआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारतीय क्रिकेट संघ