IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं 29 मार्चला सुरू होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:18 PM2020-03-24T12:18:14+5:302020-03-24T12:19:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 13 might not happen this year; BCCI could lose INR 2000cr, franchises 100cr each svg | IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, यंदा इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) होईल याची शक्यता दिवसागणित मावळत चालली आहे. त्यात आयपीएलचे 13वे मोसम होणार नाही, अशी शक्यता फ्रँचायझी मालकानं वर्तवली आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल जवळपास रद्द झाल्यात जमा आहे. लीगच्या पुढील भवितव्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार यंदाच्या वर्षी आयपीएल होणार नाही. तसे झाल्यास बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालकांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागेल. ''सद्यपरिस्थिती पाहता यंदाच्या वर्षी आयपीएल होईल, असं वाटत नाही. सध्या तरी असेच चित्र समोर दिसत आहे,''अशी माहिती फ्रँचायझी अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. 

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला जवळपास 2000 कोटींचा, तर प्रत्येक फ्रँचायझीला 100 कोटींचा नुकसान सहन करावा लागणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून अजून आयपीएलच्या 13व्या मोसमाबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. ''भविष्याबाबत कोणी काहीच सांगू शकत नाही. परदेशी पर्यटकांवरील व्हिसा बंदी केव्हा उठेल, परिस्थिती केव्हा सुधारेल हे आम्हालाही माहीत नाही. तोपर्यंत आयपीएलबाबत विचार करण्यात काहीच अर्थ नाही,'' असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की,''कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मावळला, तरी तो अन्य देशांतून गेलाच असेल याचीही खात्री नाही. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन जपानमध्ये होणार आहे आणि ती स्पर्धा पुढे ढकलण्याची चर्चा होत आहे. ऑलिम्पिक हे आयपीएल आणि अन्य स्पर्धांपेक्षा मोठी स्पर्धा आहे.'' 


15 एप्रिलपर्यंत आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लीग सुरू करण्याचा प्रस्ताव समोर येत आहे. तारीख त्याही पलिकडे गेल्यास, आयपीएल होणे अवघडच आहे.  आयपीएल जून-सप्टेंबरमध्येही घेण्याचा प्रस्ताव आहे. पण, हे सर्व परिस्थिती सुधारण्यावर अवलंबून आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...

Coronavirus : आता आयसीसीचेही ‘वर्क फ्रॉम होम’, अनेक कर्मचारी घरुनच करणार काम

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार

Web Title: IPL 13 might not happen this year; BCCI could lose INR 2000cr, franchises 100cr each svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.