इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. IPL 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020वरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, BCCIनं सर्व संकटांवर मात करून अखेर 13वे पर्व संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसची थिम घेऊन IPLनं अँथम गीत चाहत्यांसाठी आणले, परंतु त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. हे गीत चोरल्याचा दावा प्रसिद्ध रॅपर क्रिष्णा यानं केला आहे.
CSKची स्ट्रॅटेजी ठरली, सुरेश रैनाच्या जागी उतरवणार स्फोटक ओपनर; शेन वॉटसननं सांगितला गेम प्लान
6 सप्टेंबरला IPLने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ''आऐंगे हम वापस'', आम्ही परत येऊ, या आशयाचे गीत पोस्ट केले. 93 सेकंदाच्या या व्हिडीओत कोरोना व्हायरसच्या संकटात कंटाळलेल्या लोकांमध्ये आयपीएल होत असल्याचा आनंद दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत ट्विटवरव हा व्हिडीओ 4 लाख 45 हजार लोकांनी, तर यू ट्यूबवर 15 लाख लोकांनी पाहिला.
पण, रॅपर क्रिष्णा यानं ( Krishna kaul) त्याचं गाणं चोरून हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. क्रिष्णानं 2017मध्ये ''देखो कौन आया वापस'' या शीर्षकाचे गाणे प्रसिद्ध केलं होतं. त्याला 7.3 लाख व्ह्यू मिळाले होते. त्यावरूनच IPLचं अँथम चोरल्याचा दावा त्यानं केला आहे.
पाहा व्हिडीओ..
त्यानं ट्विट केलं की,''देख कौन आया वापस, हे माझं गाणं डिश्नी प्लस आणि हॉटस्टार यांनी चोरून IPLचं अँथम तयार केलं. त्यासाठी माझी परवानगीही नाही घेतली आणि मला श्रेयही दिलं गेलं नाही.''
क्रिष्णानं यावेळी त्याचं जुनं गाणं पोस्ट केलं. पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'?
सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video
IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात!
भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव
Web Title: IPL 2020 anthem plagiarized? Rapper KR$NA lashes out at BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.