इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. भारत-चीन सीमेवरील वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही ( बीसीसीआय) दबाव वाढत होता. त्यामुळे त्यांना यंदा आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर म्हणून VIVOनं माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता IPL 2020 ही आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. VIVOच्या माघारीनंतर आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे. (Patanjali IPL 2020)
कोरोना व्हायरसच्या संकटात यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार आहे. केंद्र सरकरानं तत्त्वतः मान्यता दिल्याचेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सागितले. तत्पूर्वी झालेल्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. (Patanjali IPL 2020)
![]()
पण, यंदाच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरसाठी रिलायन्स जिओ, अॅमेझॉन, बायजू आदी नावं चर्चेत असताना आता पतंजलीही या शर्यतीत उतरण्याचा विचार करत आहे. ''यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे,''असे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले. बीसीसीआयकडे ते लवकरच प्रस्तावही पाठवणार आहेत. (Patanjali IPL 2020)
''आयपीएलचे टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळवल्यास, त्याचा फायदा आयपीएलपेक्षा त्या कंपनीलाच होणार आहे. तसेच भारताच्या आत्मनिर्भर बनण्याच्या निर्धारालाही मोठे प्रोत्साहन मिळेल, असे ब्रँड तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं.
Read in English
Web Title: IPL 2020 : Baba Ramdev's Patanjali considers bidding for IPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.