IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्धच्या सामन्यात अविश्वसनीय खेळी करून राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) रातोरात स्टार बनला. त्यानं शेल्डन कोट्रेलनं टाकलेल्या 18 व्या षटकांत पाच खणखणीत षटकार खेचून सामना RRच्या बाजूनं झुकवला. सुरूवातीला राहुलला चौथ्या स्थानावर पाठवल्यानं नेटिझन्स त्याला ट्रोल करत होते, परंतु त्या एका षटकातील फटकेबाजीनं त्याच नेटिझन्सही त्याला डोक्यावर घेतले. राहुलनं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा केल्या. 85 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले. सॅमसनला सलग दुसऱ्या सामन्यात हा पुरस्कार मिळाला.
हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video
KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनंनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलनं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.
संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी
संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल
राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video
राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!
पण, या भन्नाट खेळाडूला टीम इंडियात केवळ चार ट्वेंटी-20 सामन्यांत संधी देण्यात आली आहे. त्यावरून राजस्थान रॉयल्सचे मार्गदर्शन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न यानं आश्चर्य व्यक्त केलं. तो म्हणाला,'' आताच्या घडीला संजू सॅमसन हा प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे, हे मी अनेकदा सांगितले आहे. त्याला टीम इंडियात आतापर्यंत जागा मिळत नाही हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. उत्तम फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षण आणि त्याच्या फटकेबाजीला तोडच नाही. त्याचा फॉर्म असाच राहिला तर राजस्थान रॉयल्स 2008ची पुनरावृत्ती नक्की करेल. भविष्यात त्याला टीम इंडियाच्या जर्सीत पहायला मला आवडेल.''
Web Title: IPL 2020: ‘Can’t believe he’s not in Indian side,’ Shane Warne surprised 25-year-old batsman is not playing for Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.