IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPL 2020 MI vs CSK Latest News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 15 ऑगस्टला इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली.

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 03:26 PM2020-09-19T15:26:11+5:302020-09-19T15:27:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK Latest News : After 10,646 hour's and 436 Days MS Dhoni look in action again | IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजुलै 2019मध्ये महेंद्रसिंग धोनीनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होतात्यानंतर क्रिकेटपासून दूर असलेला MS Dhoni आज क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे

जुलै 2019पासून महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) निवृत्तीची चर्चा सुरू होती अन् स्वातंत्र्य दिनी धोनीनं निवृत्तीची घोषणा केली.  भारतीय  धोनीनं  सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला.  ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार. 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला. पण, आज धोनी पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. धोनीनं 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली अन् आज तो 7.30 मिनिटांनी IPL 2020चा सलामीचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here

IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद!

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  ( IPL 2020 Live Updates, Click here

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. ( IPL 2020 Live Updates, Click here

आयपीएलमध्येही धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कर्णधार म्हणून IPLमध्ये 100 सामने जिंकणारा एकमेव कर्णधार, IPL इतिहासात सर्वाधिक 38 स्पम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर आहेत.  IPLच्या सर्वाधिक 9 फायनल खेळणारा खेळाडू ( 8 वेळा CSKकडून, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एकवेळा फायनल खेळला), IPLमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 94 झेल व 38 स्पम्पिंग करणारा खेळाडू., यपीएलमध्येही डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक 2206 धावांचा विक्रम ,  IPLमध्ये 20व्या षटकात मिळून 500हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू, इत्यादी. ( IPL 2020 Live Updates, Click here

10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... 
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं क्रिकेटपासून दूर राहणं पसंत केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीच्या त्या सामन्यानंतर धोनी आज पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.


 

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News : After 10,646 hour's and 436 Days MS Dhoni look in action again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.