ठळक मुद्देआयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे सर्व संघ यूएईत दाखल होत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) नियमानुसार आता सर्व खेळाड़ूंना सहा दिवसा क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. भारतीय खेळाडू सुरुवातीपासून आयपीएलमध्ये सहभागी होणार असले तरी परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल साशंकता आहे. त्यामुळे काही परदेशी खेळाडूंना क्वारंटाईन नियमांत सूट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स
आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे इंग्लंड - ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( इसीबी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. 24 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये रवाना होईल.
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला
इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका 25 ऑगस्टला संपेल त्यानंतर तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. 1 सप्टेंबरला ही मालिका संपेल. त्यानंतर 4 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका सुरू होईल. तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका 16 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. त्यामुळे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकावे लागणार हे निश्चित झाले आहे. पण, त्यांना क्वारंटाईन नियमात सूट देऊन आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चेअरमन संजीव चुरीवाला यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बायो सिक्यूर बबलमधून येणार आहेत, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्याची गरज नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या सदस्यांनी कुणालाही सूट मिळणार नाही, हे स्पष्ट केलं. त्यांना सांगितले,''खेळाडूंनुसार नियम बदलले जाणार नाही. सर्वांना नियम सारखेच. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या आठवड्यांचे सामने खेळू शकणार नाही, याची सर्व फ्रँचाझींनी तयारी केली आहे. कुणासाठी आम्ही संपूर्ण स्पर्धा धोक्यात आणू शकत नाही. आयपीएलच्या बायो बबल नियमात कुणालाही सूट मिळणार नाही, हे बीसीसीआयनं आधीच ठरवलं आहे.''
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका
- पहिला सामना - 4 सप्टेंबर
- दुसरा सामना - 6 सप्टेंबर
- तिसरा सामना - 8 सप्टेंबर
वन डे मालिका
- पहिला सामना - 11 सप्टेंबर
- दुसरा सामना - 13 सप्टेंबर
- तिसरा सामना - 16 सप्टेंबर
कोणत्या संघाला सर्वाधिक फटका?
आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.
- चेन्नई सुपर किंग्स - सॅम कुरन, जोश हेझलवूड, शेन वॉटसन
- दिल्ली कॅपिटल्स - अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस
- कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स, ग्रीन , गर्नी, इयॉन मॉर्गन, टी बँटन
- किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
- सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्शस स्टँनलेक, डेव्हीड वॉर्नर
- राजस्थान रॉयल्स - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुरन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोईन अली, अॅरोन फिंच, जे. फिलिफ, केन रिचर्डसन
- मुंबई इंडियन्स - कोल्टर नील, ख्रिस लीन ( यांची मालिकेसाठी निवड न झाल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता मिटली आहे)
शेन वॉटसन हा इंग्लंड-ऑस्ट्रेलया मालिकेचा भाग नसल्यानं तो दाखल झाला आहे
Web Title: IPL 2020 : ’No relaxation in IPL 2020 quarantine norms to England, Australian cricketers’, declares BCCI official
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.