IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी

यंदाचं आयपीएल हे सर्वाधिक पाहिले जाईल, असाही दावा केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 05:31 PM2020-07-24T17:31:06+5:302020-07-24T17:31:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Players should be tested daily for COVID-19: Kings XI co-owner Ness Wadia | IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी

IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता उत्सुकता लागलीय की खऱ्या अॅक्शनची. आयपीएल 2020संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणार असून 19 सप्टेंबरला पहिला सामना रंगणार आहे. यंदाची आयपीएल यूएईत होणार असल्याचे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आधीच जाहीर केलं होतं. आतापर्यंत आयपीएल 26 सप्टेंबरला होईल, अशी चर्चा होती.  पटेल यांनी सांगितलं की,''ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार असून 8 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे.'' ( players should be tested daily for COVID-19)

अल्लाह तुझं रक्षण करो; इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या पाकिस्तानी खेळाडूसाठी पत्नीनं लिहिली भावनिक पोस्ट

यंदाचं आयपीएल हे सर्वाधिक पाहिले जाईल, असं मत किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करण्यात यावी अशी अजब मागणीही केली आहे. ते म्हणाले, ''खेळाडूंची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे सुरक्षिततेसंबंधीत सर्व नियमांचं ( ऑन फिल्ड - ऑफ फिल्ड) काटेकोर पालन झालंच पाहिजे. अधिकाधिक चाचण्या व्हायला हव्यात, रोज झाल्या तर अतीउत्तम. मी क्रिकेटपटू असतो, तर माझी रोज चाचणी झालेली मला आवडलं असतं. त्यात काहीच धोका नाही.'' ( players should be tested daily for COVID-19)

इंग्लंड आणि वेस्ल क्रिकेट मंडळानं ज्या पद्धतीनं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघांसाठी बायो सिक्युर वातावरण निर्माण करणे आयपीएलला शक्य नाही. त्यात आठ संघांच्या राहण्याची सोय, हे मोठं आव्हानच आहे. ''जैव सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु आट संघाच्या स्पर्धेत त्याची अंमलबजावणी शक्य आहे का, याची कल्पना नाही. बीसीसीआयच्या निर्देशकाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. यूएईत 4 लाख 72,575 लोकांची चाचणी केली गेली आहे आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. बीसीसीआयला स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी लागेल,''असेही वाडिया यांनी म्हटले. ( players should be tested daily for COVID-19)

कोरोना व्हायरसच्या संकटात स्पॉन्सर्स मिळवणे, हेही संघांसमोरचं आव्हान आहे, परंतु यंदा आयपीएल सर्वाधिक पाहिले जाईल, असेही वाडिया यांनी म्हटले. ''यंदाची आयपीएल सर्वाधिक पाहिली जाईल, यात तिळमात्र शंका नाही. मी हे केवळ भारतापुरते बोलत नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे स्पॉन्सर्नाही प्रचंड फायदा होणार आहे आणि तेही याकडे याच दृष्टीने पाहतील. आधीच्या आयपीएलपेक्षा यंदा त्यांना जास्तीचा फायदा होणार आहे,'' असे त्यांनी सांगितले.  ( players should be tested daily for COVID-19)

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ? 

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का! 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

Video : प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; दिव्यांग मुलीची जिद्द पाहून कराल कडक सॅल्यूट!

OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!

 

Web Title: IPL 2020: Players should be tested daily for COVID-19: Kings XI co-owner Ness Wadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.