इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. संयुक्त अरब अमिराती ( UAE) होणाऱ्या IPL 2020मध्ये विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघ बाजी मारेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यात आता बेटिंग कंपन्यांमध्येही चुरस रंगताना पाहायला मिळत आहे. बेटिंग कंपन्यांनी यंदाच्या IPLमधील फेव्हरिट संघाचा अंदाज व्यक्त केला आहे.
IPL 2020 : 22 परदेशी खेळाडूंना आणण्यासाठी फ्रँचायझींनी बुक केलं चार्टर्ड विमान; मोजली तगडी रक्कम!
Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार
भारतात बेटिंगला बंदी आहे, परंतु अन्य देशांमध्ये बेटिंग लावली जाते. बेटिंगला मान्यता असलेल्या मार्केटमध्ये यूएईत होणाऱ्या स्पर्धेवर मिलियन डॉलरचा सट्टा लावला गेल्याचे, InsideSportsने सांगितले आहे. Bet365, Betway, William Hills, Betfair या बेटिंग करणाऱ्या कंपन्यांनुसार मुंबई इंडियन्स IPL 2020 जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयपीएल जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक 16.9% चान्स आहेत.
मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी!
CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
बेटिंग कंपन्यांच्या अंदाजानुसार चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) संघ यंदाही फेव्हरिट आहे. InsideSportsने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सच यंदाची फेव्हरिट आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची ( CSK) या यादीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. त्यांची नंबर 3 वरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. बॅटिंग कंपनींच्या अंदाजानुसार सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) दुसऱ्या स्थानावर आहे.
IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची समुद्रकिनारी सफर, Video
राजस्थान रॉयल्सचा 'युवा' जोश; IPL 2020मध्ये यंग ब्रिगेड सर्वांवर भारी पडणार!
कोण कितव्या स्थानी?
मुंबई इंडियन्स 16.9%
सनरायझर्स हैदराबाद 16%
कोलकाता नाइट रायडर्स 14.31%
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14.31%
चेन्नई सुपर किंग्स 13.08%
दिल्ली कॅपिटल्स 12.93%
IPL 2020 पाहण्यापूर्वी यंदाच्या पर्वातील 10 नव्या गोष्टी नक्की जाणून घ्या!
IPLमधील संघांची कामगिरीमुंबई इंडियन्स - विजेते ( 2013, 2015, 2017 व 2019), उपविजेते ( 2010)
राजस्थान रॉयल्स - विजेते ( 2008)
चेन्नई सुपर किंग्स - विजेते ( 2010, 2011 व 2018), उपविजेते ( 2012, 2013, 2015 व 2019)
कोलकाता नाइट रायडर्स - विजेते ( 2012 व 2014)
दिल्ली कॅपिटल्स - उपांत्य फेरी ( 2008 व 2009)
किंग्स इलेव्हन पंजाब - उपांत्य फेरी ( 2008)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - उपविजेते ( 2009, 2011 व 2016)
सनरायझर्स हैदराबाद - विजेते ( 2016), उपविजेते ( 2018)
डेक्कन चार्जर्स - विजेते ( 2009)
Web Title: IPL 2020 Predictions : 4 times champion Mumbai Indians starts favorite to win IPL 2020 according to bookmakers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.