Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६० पर्यंत गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:59 PM2020-03-11T12:59:50+5:302020-03-11T13:00:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020:  Public Interest Litigation (PIL) filed in the Madras High Court seeking a cancellation of the IPL's 13th edition svg | Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६० पर्यंत गेली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, ही स्पर्धाच रद्द करण्यात यावी, यासाठी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात केंद्र सरकारनं बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

वकील जी अॅलेक्स बेंझीगर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी म्हणजेच १२ मार्चला न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ''जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO)च्या वेबसाईटवरील माहितीनुसार अजूनपर्यंत कोरोना विषाणू रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही,'' असे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.  

ठरलं... Corona Virus मुळे दोन आठवडे लीग बंद दरवाजात होणार; प्रेक्षकांना No Entry!
ला लिगाचे प्रथम आणि दुसऱ्या विभागीय लढती बंद स्टेडियमवर खेळवण्याच्या वृत्ताला ला लिगानेही दुजोरा दिला आहे. स्पॅनिश क्रीडा उच्चायुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पेनमध्ये होणारे सर्व आंतरराष्ट्रीय स्तराचे सामनेही प्रेक्षकांविना खेळवण्यात यावे, असा फतवा त्यांनी काढला आहे. ''क्रीडा उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन आठवडे ला लिगा सँटेडर आणि ला लिगा स्मार्ट बँक सामने बंद स्टेडियवर खेळवण्यात येणार आहेत,'' असे निवेदन ला लिगाने जाहीर केले. ला लिगावर क्रीडा मंत्रालयाची नजर आहे.  

रेआला माद्रिद आणि एैबर यांच्यात शुक्रवारी होणारा सामना बंद स्टेडियमवर खेळवण्यात येणारा पहिला सामना असेल. स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचे १५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ला लिगाच्या या घोषणेमुळे युरोपियन स्पर्धेतील सामन्यांवरही परिणाम होऊ शकतो. बार्सिलोना आणइ नेपोली यांच्यातील चॅम्पियन्स लीगचा १८ मार्चला होणारा सामना बंद स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे.
 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!

सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!

Web Title: IPL 2020:  Public Interest Litigation (PIL) filed in the Madras High Court seeking a cancellation of the IPL's 13th edition svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.