इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. शिवाय मुंबई इंडियन्सनेही ट्रेंट बोल्टला आपलेसे केले आहे. आयपीएल 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तत्पूर्वी ट्रेड ( अदलाबदली) करून संघ त्यांना हवा तो खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेत आहेत. आतापर्यंत दिल्लीनं सर्वाधिक खेळाडूंची अदलाबदल केली आहे. यात चेन्नई सुपर किंग्सचे नाव कुठेच दिसत नाही. पण, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबतचे मोठे संकेत दिले होते आणि त्यानुसार त्यांनी पाच खेळाडूंना रिलिज केले.त्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबादनेही त्यांच्या पाच प्रमुख खेळाडूंना नारळ दिला.
चेन्नई सुपर किंग्सने एक ट्विट केलं. त्यात त्यांनी पाच खेळाडूंना रिलिज करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला यंदा संघाबाहेर करू शकतात. 7.80 कोटी रक्कम मोजलेल्या केदारला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. केदारसह अंबाती रायुडू, करन शर्मा, सॅम बिलींग आणि मुरली विजय यांना डच्चू दिल जाऊ शकतो, असा तर्क लावला जात होता. पण, यापैकी सॅम बिलींगचा अंदाज खरा ठरला. त्याच्याशिवाय चैतन्य बिश्नोई, ध्रुव शोरेय, डेव्हीड विली आणि मोहित शर्मा यांना डच्चू दिला.
चेन्नई सुपर किंग्सनं पाच खेळाडूंना दिला डच्चू; जाणून घ्या कोण आहेत ते!
हैदराबादने युसूफ पठाण, शकीब अल हसन, मार्टिन गुप्तील, दीपक हूडा आणि रिकी भूई यांना करारमुक्त केले. फिक्सिंग प्रकरणाची माहिती न दिल्यामुळे शकिबवर आयसीसीन बंदी घातली आहे. त्यामुळे तो आयपीएलला मुकणार होता.
Web Title: IPL 2020 : SRH release Yusuf Pathan, Shakib Al Hasan, Martin Guptill, Deepak Hooda, Ricky Bhui from their squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.