कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13वे मोसम पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही ( आयसीसी) जूनपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्थगित केल्या आहेत. त्यात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिल्यास वर्ल्ड कपही रद्द केला जाऊ शकतो.
आयपीएल स्थगित झाली असली तरी बीसीसीआय त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करत आहे. त्यानुसार जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास त्या कालावधीत बीसीसीआय आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे. तेही प्रेक्षकांविना. ऑक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 या कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्याशिवाय आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्यास, आयपीएल खेळवण्याच्याही बीसीसीआयच्या डोक्यात आहे.
आयपीएल 2020च्या तुलनेत आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि आशिया कप यांना कमी महत्त्व देईल, असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बसीत अलीनं केला आहे. त्याने सांगितले की,''आयसीसीच्या महसुलात बीसीसीआयचा 70 टक्के वाटा आहे. त्यामुळे भारतातील कोरोना व्हायरसचे संकट कायम राहिल्यास आयसीसी बीसीसीआयला आयपीएल 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी नवीन विंडो तयार करू शकते.''
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यांनी 29 मार्चला आयपीएल स्पर्धा सुरू होणार होती. पण, ती 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध
ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका
MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो
संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...
Web Title: IPL 2020 Would Be Preferred By ICC Over T20 World Cup, Asia Cup: Ex-Pak Batsman Basit Ali svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.