IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

IPL 2020 : भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:33 PM2020-08-19T17:33:19+5:302020-08-19T17:34:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Yes, Chinese company invests in Dream 11, but ...; BCCI officials put board view | IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अखेर टायटल स्पॉन्सर सापडला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या मोसमाची टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ने मिळवले. भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून माघार घेतली. आता ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशिप नावावर केली. पण, ड्रीम 11मध्ये चिनी कंपनीच्या गुंतवणूकीवरून नवा वाद सुरू झाला आहे. याबाबात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अधिकाऱ्यानं महत्त्वाचं विधान केलं.

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. पण, यंदाच्या वर्षासाठीच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत ड्रीम 11, टाटा सन्स, बायजू आणि अनअकॅडमी यांच्यात चुरस रंगली. 

ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन काय? 
स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.

पण, ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन आहे. त्यांच्या कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. Tencent ही चायनीज कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी म्हणून Tencentची ओळख आहे आणि त्यांची ड्रीम 11मध्ये 10 टक्के भागीदारी आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

बीसीसीआयचं म्हणणं काय? 
बीसीसीआयच्या  अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "Tencent या कंपनीची ड्रीम 11मध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी भागीदारी आहे आणि ड्रीम 11चे संस्थापक भारतीय आहेत. ड्रीम 11 या कंपनीमध्ये काम करणारे 400 पेक्षा अधिक लोक, तेही भारतीय आहेत आणि ड्रीम 11मध्ये भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूकही आहे."

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

 

Web Title: IPL 2020: Yes, Chinese company invests in Dream 11, but ...; BCCI officials put board view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.