IPL 2021 Auctions: इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League 2021) हा फलंदाजांचा खेळ म्हणून ओळखला जात असला तरी अनेक गोलंदाजांनी ही लीग गाजवली आहे. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजांसोबतच प्रत्येक फ्रँचायझी हुकूमी गोलंदाजाच्या शोधात असतेच... त्यात भारतीय खेळपट्टीवंर फिरकी गोलंदाजांना मिळणारी मदत पाहून फ्रँचायझी स्पिनर्ससाठीही मोठी बोली लावताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आयपीएल ऑक्शनमध्ये वरुण चक्रवर्थी ते मुरुगन अश्विन आणि शिविल कौशिल ते के सी चरीअप्पा या फिरकीपटूंसाठी फ्रँचायझीनी बक्कळ रक्कम मोजल्याचा इतिहास आहे. ( Mystery Spinners Who Have Started Bidding Wars ) IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस!
आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. चेन्नईत गुरुवारी हे ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini-Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु ८ फ्रंचायझींनी यापैकी २९२ नावांची अंतिम यादी BCCIकडे सोपवली. ( PL Auction 2021 Player List) IPL Auction 2021 : चेन्नईत होणार २९२ खेळाडूंचा लिलाव, जाणून घ्या तारीख, वेळ, संघाची यादी अन् सर्वकाही
मुरुगन अश्विन ( Murugan Ashwin) - लेग ब्रेक/गुगली टाकण्यात माहीर असलेल्या या फिरकी गोलंदाजाला २०१६मध्ये पुणे सुपरजायंट्सनं ४.५ कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याच्या मुळ किंमतीपेक्षी ही रक्कम ४५ पटीनं अधिक होती.
सचित्रा सेनानायके ( Sachithra Senanayake ) - कोलकाता नाईट रायडर्सनं KKR २०१३च्या लिलावात श्रीलंकेच्या या फिरकीपटूला ३.३ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते. सर्वोत्तम कॅरम बॉल टाकणारा गोलंदाज म्हणून सेनानायकेची ओळख आहे.
वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthy ) - लेग ब्रेक गुगली स्पेशालिस्ट गोलंदाज वरुण चक्रवर्थीला कोलकाना नाइट रायडर्सनं २०१९च्या ऑक्शनमध्ये ८.४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. श्रीलंकेचा स्टार गोलंदाज अजंथा मेंडिस याच्यासारखी वरुण चक्रवर्थीची शैली आहे. २०१८-१९च्या विजय हजारे ट्रॉफीत त्यानं सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.
शिविक कौशिक ( Shivil Kaushik ) - २०१६च्या लिलावात १० लाखांची मुळ किंमत असलेल्या कौशिकला गुजरात लायन्सनं आपल्या ताफ्यात घेतलं. चायनामन गोलंदाजी ही त्याची शैली आहे. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं सर्वांचे लक्ष वेधले होते.
के सी चरीअप्पा ( K.C Cariappa ) - रहस्यमयी लेग स्पीन करणाऱ्या या गोलंदाजाकडे विविधता आहे. २०१५मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं त्याच्यासाठी २.४ कोटी रुपये मोजले.
संदीप लामिछाने ( Sandeep Lamichhane ) - नेपाळचा पहिला गोलंदाज ज्यानं आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलं. जगभरातील विविध लीगमध्येही त्यानं कमाल दाखवली आहे. २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं त्याला २० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले. IPL 2021 Auction : लसिथ मलिंगाच्या जागी कोण?; Mumbai Indians या ७ खेळाडूंवर लावणार बोली!
प्रयास राय बर्मन ( Prayas Ray Barman) -या गोलंदाजासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १.५ कोटी मोजले होते. २०२१च्या ऑक्शनमध्ये हा सर्वात भाव खावून जाऊ शकतो.
नूर अहमद ( Noor Ahmad ) - अफगाणिस्तानच्या या गोलंदाजाला आयपीएल २०२१च्या लिलावात २० लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये स्थान दिले गेले आहे. IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...
ख्रिएव्हित्सो केन्से ( Khrievitso Kense) - १६ वर्ष व ३४७ दिवसांचा केन्से हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याला मुंबई इंडियन्सनं ट्रायलसाठीही बोलावले होते.
केव्हिन कोथिगोडा ( Kevin Koththigoda) - श्रीलंकेच्या २२ वर्षीय गोलंदाजानं त्याच्या रहस्यमयी स्टाईलनं सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे. २०२१च्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी जोरदार चुरस नक्की रंगेल.
पाहा व्हिडीओ..
Web Title: IPL 2021 Auctions: Mystery Spinners Who Have Started Bidding Wars in IPL Auctions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.