IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:38 PM2021-04-03T14:38:58+5:302021-04-03T14:43:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Axar Patel tested positive for COVID-19 and he is isolating with all protocols, DC Source to ANI  | IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रमुख खेळाडू नितीश राणा ( Nitish Rana) हा सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह सापडला. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या ८ मैदान कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्रमुख गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सात दिवसानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे, परंतु आता या सामन्यात अक्षर पटेलचं खेळणं अनिश्चित मानलं जात आहे. IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरनं विचारलं क्वारंटाईनचा वेळ कसा घालवू?; रोहित शर्मानं दिलेलं भन्नाट उत्तर व्हायरल

ANIशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी सांगितले की,''दुर्दैवानं अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो आयसोलेट झाला आणि आणि सर्व नियमांचं पालन केलं जात आहे.'' BCCIच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला आयसोलेट व्हावे लागेल आणि १० दिवस बायो-बबल एरियापासून दूर रहावे लागेल. या दहा दिवसांत खेळाडूनं विश्रांती करावी आणि अधिकचा व्यायाम करणे टाळावे. टीमचे डॉक्टर त्याची नियमित चाचणी करतील. खेळाडूची प्रकृती बिघडल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये नेले जाईल.  सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती


वानखेडे स्टेडियमवर कोरोनाचा शिरकाव
वानखेडे स्टेडियमवरील ८ मैदान कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. मागील आठवड्यात १९ मैदान कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ जणांचा कोरोना रिपोर्ट आधीच पॉझिटिव्ह आला होता आणि १ एप्रिलला अन्य पाच जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. मागच्या वर्षी भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती.  या मैदान कर्मचाऱ्यांना अन्य ग्राऊंडस्टाफ सदस्यांपासून वेगळं करून आयसोलेशनमध्ये ठेवले आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.  रिषभ पंत अन् उर्वशी रौतेला यांची पुन्हा चर्चा; अभिनेत्रीच्या उत्तरानं सारेच हैराण, जाणून घ्या नेमकं प्रकरण

अक्षर पटेलचं कसोटीत विक्रमी पदार्पण
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून अक्षरनं पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात ( २-४० व ५-६०) सात विकेट्स घेत इतिहास रचला. तीन सामन्यांत त्यानं २७ विकेट्स घेत सर्वांना थक्क केलं.

Web Title: IPL 2021 : Axar Patel tested positive for COVID-19 and he is isolating with all protocols, DC Source to ANI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.