DC vs SRH IPL 2021 match: गेल्या वेळी कोरोनामुळे आयपीएल अर्धवट थांबवावी लागली होती. उर्वरित स्पर्धा युएईमध्ये सुरु झाली आहे. परंतू या स्पर्धेमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी. नटराजन (T Natarajan) कोरोना बाधित (corona Positive) झाला असून त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. (One Sunrisers Hyderabad player found COVID positive, fate of evening match against Delhi Capitals hinges on RTPCR reports of remaining squad.)
महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी दिल्ली आणि हैदराबादमध्ये मॅच खेळविली जाणार आहे. त्या आधीच नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने आजच्या या मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे. सनराइजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आहे. तरीही सामना खेळविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता संघातील अन्य खेळाडूंचीही आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.
दरम्यान, विजय शंकर (खेळाडू), टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओथेरपिस्ट शामसुंदर, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, नेट बॉलर पेरीयास्वामी गणेशन या सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Read in English
Web Title: IPL 2021 Breaking: Sunrisers Hyderabad player T Natarajan found COVID positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.