IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट

IPL 2021: मुंबईच्या वानखेडे मैदानावत जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरुन कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या विजयासाठी मेहनत करत होता. त्याचवेळी रांचीमध्ये धोनीचे आई-वडील हॉस्पीटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:28 PM2021-04-22T15:28:55+5:302021-04-22T15:31:40+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 csk coach stephen fleming talk with ms dhoni gives an update on parents covid situation | IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट

IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: मुंबईच्या वानखेडे मैदानावत जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरुन कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या विजयासाठी मेहनत करत होता. त्याचवेळी रांचीमध्ये धोनीचे आई-वडील हॉस्पीटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे २१ एप्रिल रोजी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. (ipl 2021 csk coach stephen fleming talk with ms dhoni gives an update on parents covid situation)

धोनीच्या आई-वडिलांच्या तब्येतीबाबत ड्रेसिंग रुममध्ये जास्त चर्चा होत नव्हती, असं फ्लेमिंग यांनी सांगितलं. धोनीच्या आई-वडिलांना रांचीच्या पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याची माहिती धोनीचे मॅनेजर आणि त्याचा मित्र अरुण पांडे यांनेही ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 

महेंद्रसिंग धोनीच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

धोनीच्या आई-वडिलांच्या तब्येतीबाबत धोनीशी चर्चा झाल्याची माहिती स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पुढील काही दिवस धोनीचे आई-वडिल डॉक्टरांच्या निगराणीखाली राहतील अशीही माहिती फ्लेमिंग यांनी दिली. फ्लेमिंग यांच्या माहितीनुसार, संघाला सध्याच्या कठीण काळात खूप चांगलं सहकार्य देखील लाभत आहे आणि प्रत्येक जण धोनीच्या कुटुंबियांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहे. ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंमध्ये धोनीच्या कुटुंबियांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पण व्यवस्थापनाकडून आम्हाला धोनीच्या कुटुंबियांच्या आरोग्याची माहिती दिली गेली, असं फ्लेमिंग यांनी सांगितलं 

कॅप्टन असाच हवा; अफलातून खेळीनंतर ऋतुराज गायकवाड MS Dhoniबद्दल काय म्हणाला ऐका, Video

आई-वडिल कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीनंतरही धोनी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. धोनीनं यावेळी केवळ ८ चेंडूत २०० पेक्षाही अधिक स्ट्राइक रेटनं १७ धावा केल्या. यात सीएसकेनं प्रथम फलंदाजी करत २० षटकांच्या अखेरीस ३ विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल २२० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला आणि चेन्नईच्या संघानं सामना १८ धावांनी जिंकला.
 

Web Title: ipl 2021 csk coach stephen fleming talk with ms dhoni gives an update on parents covid situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.