IPL 2021, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इंडियन प्रीमिअर लीग २०२१ ( IPL 2021) च्या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर ( CSK) तगडे आव्हान उभे केले आहे. राहुल त्रिपाठीच्या फटकेबाजीला नितीश राणा, दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल यांची उत्तम साथ मिळाली. पण, या सामन्यात पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) त्याच्या कामगिरीतून त्याचे महत्त्व अधोरेखित केलं. जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूला बाद करायचे आहे, तर शार्दूलशिवाय उत्तम पर्याय असूच शकत नाही, हे या सामन्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. फॉर्मात असलेल्या वेंकटेश अय्यरनंतर शार्दूलनं हिटर आंद्रे रसेल याला मॅजिकल चेंडू टाकून बाद केले अन् CSKसमोरील मोठा अडथळा दूर केला.
या सामन्यात शार्दूलनं अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) सहावं षटक फेकण्यासाठी शार्दूलला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरची विकेट घेतली. आयपीएल २०२१मध्ये त्यानं या विकेटसह एकप्रकारे हॅटट्रिक पूर्ण केली. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेंकटेश अय्यर ( १८) धोनीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. मागील सामन्यात शार्दूलनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध त्याच्या अखेरच्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर विकेट्स घेतल्या होत्या आणि आज त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेत एकप्रकारे हॅटट्रिक पूर्ण केली.
महेंद्रसिंग धोनी नाराज झाला, अफलातून कॅच घेऊनही अम्पायरच्या निर्णयाचा त्याला राग आला
RCBविरुद्ध त्यानं १७व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त पडिक्कल ( ७०) यांची विकेट घेतली होती. त्या सामन्यात त्यानं ४ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या. आज त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर शार्दूलनं १७व्या षटकात रसेलचा ( २०) त्रिफळा उडवून संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
पाहा व्हिडीओ..
शार्दूल ठाकूरनं IPL2021त घेतलेल्या महत्त्वाच्या विकेट्स ( Shardul Thakur's key wickets in IPL 2021) - शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल
Web Title: IPL 2021, CSK vs KKR : Andre Russell goes for 20, Magical ball from Shardul Thakur, picks up the big wicket, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.