IPL 2021: आयपीएलमध्ये आज दुबईत चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात लढत सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या केकेआरची सुरुवात थोडी निराशाजनक झाली आहे. केकेआरचे सलामीवीर तंबूत दाखल झालेले असताना संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी कर्णधार इयॉन मॉर्गन याच्यावर होती. मॉर्गन सुरुवातीला सावध फलंदाजी करताना पाहायला मिळाला. पण संघावर निर्माण झालेला दबाव नाहीसा करण्यासाठी मॉर्गन यानं जॉश हेजलवूड याच्या शॉर्ट पिच चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेनं मोठा फटका मारला आणि इथंच मोठा घात झाला.
लाँग ऑनवर चेन्नईचा अव्वल दर्जाचा फिल्डर फॅफ ड्यू प्लेसिस सीमारेषेजवळ होता. सीमारेषेजवळ फिल्डिंग कशी करावी याचे वस्तुपाठ फॅफनं याआधीही घालून दिले आहेत. त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फॅफनं चेंडूचा अंदाज घेत अतिशय हुशारीनं सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू अतिशय अलगदपणे टिपला आणि मॉर्गनला माघारी धाडलं. फॅफनं टिपलेल्या या झेलची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वजण फॅफनं दाखवलेल्या समयसूचकतेचं कौतुक करत आहेत. फॅफनं टिपलेल्या अप्रतिम झेलमुळे कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याला अवघ्या ८ धावांवर माघारी परतावा लागलं आहे.
Web Title: IPL 2021 csk vs kkr faf du plessis takes stunning catch of eoin morgan watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.