ipl 2021 t20 CSK Vs SRH live match score updates Delhi : डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्या वैयक्तिक अर्धशतकानंतर केन विलियम्सन व केदार जाधव यांनी अखेरच्या दोन षटकांत चोपलेल्या धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) मोठी धावसंख्या उभारली. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) सामन्यावर पकड घेतलीय असे चित्र दिसत असताना केन व केदार यांनी फटकेबाजी करून २० षटकांत ३ बाद १७१ धावांचा डोंगर उभा करून दिला. पण, या सामन्यात CSKच्या सुरेश रैनाच्या ( Suresh Raina) एका कृतीनं सर्वांची वाहवाह मिळवलीच, शिवाय CSKला मोठा फायदाही करून दिला. IPL 2021 : CSK Vs SRH T20 Live Score Update
सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सॅम कुरननं चौथ्या षटकात SRHला पहिला धक्का दिला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १०६ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये ५० अर्धशतक झळकावणारा वॉर्नर हा पहिलाच खेळाडू ठरला. या अर्धशतकासह त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार केला. शिवाय आयपीएलमध्ये त्यानं २०० षटकारही पूर्ण केले. वॉर्रननं ५५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. मनीष ४६ चेंडूंत ६१ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करून बाद झाला. शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १९व्या षटकात केन विलियम्सननं २० धावा चोपल्या. अखेरच्या षटकात १३ धावा आल्या. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match
सुरेश रैनानं काय केलं?
सामन्याच्या १६व्या षटकात रवींद्र जडेजानं टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर मनीष पांडेला झेलबाद करण्याची संधी होती. सुरेश रैनानं तो चेंडू टिपलाही, परंतु तो त्याच्या हातात विसावण्यापूर्वी बाऊन्स झाल्याची प्रांजळ कबुली त्यानं दिली. रिप्ले पाहण्यात वेळ वाया जाऊ नये याकरिता त्यानं हे पाऊल उचललं आणि त्याच्या या Fair Playमुळे चेन्नईनं Fair Play award मुळे तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
Web Title: IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : Suresh Raina straightway told that the ball reached him on bounce to avoid wasting time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.