IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्समुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय, फास्ट फॉरवर्डनेच त्यांचे सामने पाहणार - वीरेंद्र सेहवाग 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) प्रवास गटांगळ्या खात सुरू आहे. सात सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीतीत त्यांचे आव्हान खडतर झाले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 03:42 PM2021-04-30T15:42:40+5:302021-04-30T15:42:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : I can’t digest this, all KKR matches are a bit boring to me: Virender Sehwag | IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्समुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय, फास्ट फॉरवर्डनेच त्यांचे सामने पाहणार - वीरेंद्र सेहवाग 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्समुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय, फास्ट फॉरवर्डनेच त्यांचे सामने पाहणार - वीरेंद्र सेहवाग 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) प्रवास गटांगळ्या खात सुरू आहे. सात सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीतीत त्यांचे आव्हान खडतर झाले आहे. दिल्ली कॅपिटल्स ( DC) विरुद्धच्या सामन्यात सर्व आघाड्यांवर KKR अपयशी ठरले. त्यांच्या या कामगिरीवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. KKRमुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय आणि त्यांचा पुढचा सामना फास्ट फॉरवर्ड करून पाहीन असेही तो म्हणाला. सहा चेंडूंत सहा चौकार; KKRचा गोलंदाज शिवम मावी यानं पडकली पृथ्वी शॉची मान, Video Viral

KKRच्या सलामीवीरांना सातत्यानं अपयश येत आहे. मधल्या फळीतील फलंदाजही फार काही कमाल दाखवत नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आंद्रे रसेलच्या ( ४५) फटकेबाजीच्या जोरावर KKRनं १५४ धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. नितीश राणआ व राहुल त्रिपाठी यांनी त्यांच्या विकेट्स फेकल्या. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ४२ धावा केल्या. क्रिकबजशी बोलताना वीरेंद्र सेहवागनं KKRची फलंदाजी पाहणे म्हणजे कंटाळवाणा सीन पाहण्यासारखा आहे, असे स्पष्ट मत केले.  ४, ४, ४, ४, ४, ४; पृथ्वी शॉनं इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला!

तो म्हणाला,''मी हे पचवू शकत नाही. एखाद्या चित्रपटाचा नावडता सीन टाळण्यासाठी मी फास्ट फॉरवर्ड बटन दाबतो. आता यापुढे KKR चे सामने माझ्यासाठी कंटाळवाणे असतील आणि मी फास्ट फॉरवर्ड करूनच यापुढे ते पाहिन. त्यांच्यामुळे ही स्पर्धा कंटाळवाणी वाटू लागली आहे. प्रत्येक सामन्यात त्याच चूका त्यांच्याकडून होत आहे. धावांचा पाठलाग करतानाही, त्याच चूका,'' असे सेहवाग म्हणाला. ऐकावं ते नवलंच; CSKच्या सदस्यानं अज्ञात व्यक्तिचा ऑक्सिजन सिलेंडर एअरपोर्टवरून उचलला अन् भलताच गोंधळ झाला!

तो पुढे म्हणाला की,''सुदैवानं इयॉन मॉर्गननं मागील सामन्यात काही धावा केल्या, परंतु तिच चूक केली. संघ व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहेत, असे मला वाटत नाही. खेळाडूंना तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे, असे तुम्ही म्हणाल, परंतु फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्यास हरकत नाही, त्यानं निकालही बदलेल.'' Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

''आंद्रे रसेलनं फलंदाजीला मॉर्गन व सुनील नरीन यांच्या आधी यायला हवं. जेणेकरून तो १२व्या षटकात येईल आणि KKRच्या धावाही वाढतील. नितीश राणा सलामीला येऊन हवी तशी सुरुवात करून देत नाहीय. शुबमननं ४० धावा केल्या, परंतु त्यानं त्यासाठी बरेच चेंडू खेळले,''असेही वीरू म्हणाला.  
 

Web Title: IPL 2021 : I can’t digest this, all KKR matches are a bit boring to me: Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.