Indian Premier League 2021 : पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians Vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात ९ एप्रिलला सलामीचा सामना होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली असली तरी २०१९नंतर भारतात होणाऱ्या आयपीएलसाठी सारेच उत्सुक आहेत. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, अहमदाबाद व कोलकाता येथे आयपीएलचे सामने खेळवण्यात येत असले तरी फ्रँचायझींना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. त्यामुळे संघांना तटस्थ ठिकाणी खेळावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर यंदाच्या आयपीएलमध्ये काही नवीन नियमांचाही समावेश केला गेला आहे. IPL 2021
आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं. सामन्यात कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर चौथ्या पंचाची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. वेळ वाया घालविणाऱ्या फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार चौथ्या पंचांना असणार आहे. संघाकडून वेळेच्या बंधनाचा नियम भंग झाल्यास स्लो ओव्हर रेटच्या शिक्षा करण्याचा अधिकार चौथ्या पंचाला असणार आहे. IPL 14th Season
Soft Signal चा नियम नसणार
भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेत Soft Signal हा नियमावरून बराच गोंधळ झाला होता. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना ICCला नियमात सुधारणा करण्याची विनंती केली होती. ICCचं माहित नाही, पण BCCIनं कर्णधाराची ही मागणी मान्य केली आहे आणि सॉफ्ट सिग्नल हा नियमच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कॅप्टनवर बंदीची टांगती तलवार
षटकांची वेग संथ ठेवल्यास अम्पायर कठोर निर्णय घेऊ शकतो. जर एका संघानं दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात षटकांचा वेग संथ ठेवल्यास कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची चूक कर्णधाराला महागात पडू शकते.
आयपीएल २०२१मधील फ्रँचायझींचे कर्णधार व त्यांची वय
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( २३ वर्ष)
- राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन ( २६ वर्ष)
- किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल ( २८ वर्ष)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली ( ३२ वर्ष)
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( ३३ वर्ष)
- सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर ( ३४ वर्ष)
- कोलकाता नाइट रायडर्स - इयॉन मॉर्गन ( ३४ वर्ष)
- चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी ( ३९ वर्ष)
- यंदाच्या आयपीएलमधील रिषभ पंत हा सर्वात युवा कर्णधार आहे. ( Rishabh Pant is the youngest captain of 2021 season)
- डेव्हिड वॉर्नर व इयॉन मॉर्गन हे दोन परदेशी कर्णधार आहे. ( David Warner and Eoin Morgan the two foreign captains)
Web Title: IPL 2021 : if there is more than 2 offence for slow over-rate then there will be one match ban for the captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.