शहर बदललं अन् कोलकाता नाईट रायडर्सचं ( Kolkata Knight Riders) नशीब पालटलं. पाच सामन्यांत सलग चार पराभवानंतर KKRनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियम अन् लोकेश राहुल यांचं काही केल्या जुळताना दिसत नाही. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतही राहुलला येथे चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि आजही तेच झालं. KKRनं आजचा सामना जिंकला, परंतु त्यांनी संघातील त्रुटी सोडवलेल्या नाहीत. पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update
IPL 2021 : KKR vs PBKS T20 Match Highlight :
- नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इयॉन मॉर्गननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेचे सामने इथेच झाल्यानं त्याला येथील खेळपट्टीचा चांगला अनुभव होता. त्याचा हा निर्णय गोलंदांनी चुकीचा ठरू दिला नाही.
- लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी PBKS सावध सुरूवात करून दिली. पण, अवघ्या सहा धावांत त्यांनी तीन प्रमुख खेळाडू गमावले. ० बाद ३६ वरून त्यांचा संघ ३ बाद ४२ असा गडगडला. लोकेश ( १९), ख्रिस गेल ( ०) व दीपक हुडा ( १) हे झटपट बाद झाले.
- आजच्या सामन्यात फॅबियनच्या जागी अंतिम ११मध्ये संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डननं अखेरच्या षटकांत दमदार फटके मारून पंजाबला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जॉर्डननं १८ चेंडूंत ३० ( १ चौकार व ३ षटकार) धावा कुटल्या आणि त्यामुळे पंजाब किंग्स ९ बाद १२३ धावांपर्यंत मजल मारू शकले.
- सुनील नरीन ( २-२२), प्रसिद्ध कृष्णा ( ३-३०), पॅट कमिन्स ( २-३१) यांनी पंजाब किंग्सला धक्के दिले. वरुण चक्रवर्थी ( १-२४) व शिवम मावी ( १-१३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. शिवम मावीचे खास कौतुक करायला हवं त्यानं ४ षटकांत १३ धावा दिल्या.
- हे माफक लक्ष्य KKRला सहज पार करता आले असते, परंतु पुन्हा एकदा शुबमन गिल अपयशी ठरला. त्याच्या मागोमाग नितीश राणा व सुनील नरीन भोपळाही न फोडता माघारी परतले. चुकीच्या फटक्यांनी त्यांचा घात केला. त्यामुळे त्यांची अवस्था ३ बाद १७ अशी झाली होती.
- KKRला या समयी चांगल्या भागीदारीची गरज होती आणि कर्णधार इयॉन मॉर्गन व राहुल त्रिपाठी यांनी ती पूर्ण केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून लोकेश राहुलचे सर्व डावपेच हाणून पाडले.
- खरं तर पंजाब किंग्सने चांगल्या सुरुवातीनंतर सामन्यावर पकड घेणं अपेक्षित होतं, परंतु लोकेशला गोलंदाजांचा योग्य वापर करून घेता आला नाही. त्यात क्षेत्ररक्षणातील चूका महागात पडल्या.
- मॉर्गन व दिनेश कार्तिकनं कोलकाताचा विजय पक्का केला. पण, आता पुढे जाताना त्यांना संघातील उणीवा दूर कराव्या लागतील. शुबमन गिलचे अपयश हे संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. अशात पुढील सामन्यांत सलामीची जोडी बदलली तर आश्चर्य वाटायला नको.
- सुनील नरीन व इयॉन मॉर्गन हे चांगले पर्याय ठरू शकतात. पण, मधल्या फळीत मग अनुभवी दिनेश कार्तिकला जबाबदारीनं खेळ करावा लागेल.
Web Title: IPL 2021, KKR vs PBKS T20 Match Highlight : Kolkata Knight Riders beat Punjab Kings by five wickets, Jump to the 5th spot
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.