ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला. त्याच्या एका षटकानं मुंबई इंडियन्सचा ( MumbaI Indians) डावच बदलला. त्यानं रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड या स्टार फलंदाजांना बाद केले आणि मुंबईचे ५ फलंदाज अवघ्या १७ धावांत माघारी परतले. त्यामुळे दिल्लीनं जबरदस्त कमबॅक केले. IPL 2021 : MI vs DC T20 Live Score Update
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत यानं मार्कस स्टॉयनिसकडून आज गोलंदाजीची सुरूवात करून घेतली. पहिल्याच षटकात रोहितसाठी पायचीतची अपील झाली, परंतु अम्पायरनं नकार दिला. त्यानंतर आर अश्विननं टाकलेल्या दुसऱ्या षटकातही रोहितसाठी LBW अपील झाली आणि याही वेळेस अम्पायर नाबादच निर्णय दिला. खेळपट्टीवर सावरल्यानंतर रोहितनं फटकेबाजीला सुरुवात केली. पण, मार्कसनं तिसऱ्या षटकाट क्विंटनला ( १) माघारी पाठवले. यष्टिमागे रिषभनं झेल टिपला. पण, रोहित व सूर्यकुमार यादव फटकेबाजी करत होते. रोहितनं दिल्लीचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू लाँग ऑफवर उत्तुंग षटकात खेचला. ९५ मीटरचा हा षटकार पाहून प्रेक्षकगॅलरीत बसलेल्या क्रिकेटपटूंच्या पत्नींची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video
मिश्राजींनी कमाल केली, शर्माजींची विकेट घेतली...
रोहित व सूर्यकुमार यादव या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. आवेश खाननं ही भागीदारी तोडली. सूर्यकुमार यादव १५ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. रोहितचे वादळ रोखण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं आज अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याला खेळवले. त्यानं दुसऱ्याच षटकात मोठा पराक्रम केला. अमितनं MIचा कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना एकाच षटकात माघारी पाठवले. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. हार्दिक भोपळ्यावर गेला. आयपीएलमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक ७ वेळा बाद करण्याचा विक्रम अमितनं नावावर केला. २०१५ नंतर ( वि. दिल्ली कॅपिटल्स, इम्रान ताहीर) हार्दिक पांड्या प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. IPL 2021 latest news, MI vs DC IPL Matches
ललित यादवच्या आतमध्ये येणाऱ्या चेंडूला कट करण्याचा चुकीचा प्रयत्न कृणाल पांड्याला महागात पडला अन् मुंबईचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्ड आज पुन्हा एकदा MIचा तारणहार ठरेल असे वाटले होते, परंतु अमित मिश्रानं त्याला गुगलीवर LBW केले. मुंबई इंडियन्सनं १७ धावांत पाच फलंदाज गमावले आणि यापैकी तीन बळी अमित मिश्राने टिपले. IPL 2021 MI vs DC, MI vs DC Live Match
पाहा विकेट्स
Web Title: IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Amit Mishra the game changer, gets Rohit, Hardik, Pollard; MI lost 5 wickets in 17 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.