गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वात चारपैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात MIच्या फलंदाजांना अपयश आले. अमित मिश्राच्या फिरकीसमोर त्यांना आक्रसताळेपणाचे फटके मारून स्वतःच्या विकेट्स फेकल्या. त्या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापतीमुळे मैदानही सोडावे लागले होते आणि किरॉन पोलार्डनं नेतृत्व सांभाळले होते. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे. पण, या सामन्यात एक चूक रोहित शर्माला संघाबाहेर बसवण्यास पूरेशी ठरू शकते. IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update
मुंबई इंडियन्स ( MI) आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, फलंदाजी विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेता MI गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईला चार पैकी दोन सामने जिंकता आले आहेत. मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना हार मानावी लागली होती आणि त्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारून MIच्या पराभवाचा खड्डा खणला होता. त्या सामन्यातील चुका टाळून मुंबई इंडियन्स आज पंजाबचा ( PBKS) सामना करणार आहे. ( MI Playing XI vs PBKS IPL 2021) लॉकडाऊनमध्ये घर बसल्या बक्षीस जिंकण्याची संधी
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईला प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १३७ धावा करता आल्या अमित मिश्रानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ४ बाद १३८ धावा करून हा सामना सहज जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. पण, पराभव, दुखापत यांच्यापाठोपाठ रोहित शर्माला १२ लाखांचा दंड भरावा लागला होता. षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे त्याला हा दंड भरावा लागला. ही त्याची पहिलीच चूक होती, परंतु आजच्या सामन्यात त्यानं ही चूक पुन्हा केल्यास नियमानुसार त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल. त्यामुळे आज षटकांचा वेग कायम राखण्याचं आव्हानही रोहितला पेलावं लागणार आहे.MI Vs PBKS, MI Vs PBKS live score,
Web Title: IPL 2021: MI Vs PBKS T20 Live: Rohit Sharma will be banned for one match, know about rule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.