IPL 2021, MI vs SRH, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाका होत आहे. एकाच वेळी दोन सामने खेळवले जात आहेत. यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना अबूधाबीच्या स्टेडियमवर (Abu Dhabi Stadium) होत आहे. सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकताच स्टेडियमवर उपस्थित मुंबईच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कारण आजची नाणेफेक मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्त्वाची होती. मुंबईला आज प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याची शेवटची संधी आहे आणि त्यासाठी खडतर आव्हान संघासमोर आहे. आज संघाला प्रथम फलंदाजी करत दोनशेहून अधिक धावा कराव्या लागणार आहेत आणि हैदराबादवर १७० पेक्षा अधिक धावांनी विजय प्राप्त केला तरच मुंबईला गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेता येणार आहे. मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात फिरकीपटू पियूष चावलाला संधी दिली आहे.
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ तीन सामन्यांमधील विजयासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिकता असली तर संघानं आज मोठा बदल केलेला पाहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाला आजच्या सामन्यात पुन्हा एकदा नवा कर्णधार मिळाला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांच्यानंतर आता हैदराबादच्या संघ व्यवस्थापनानं मनिष पांडेला कर्णधार पदाची धुरा दिली आहे. आजच्या सामन्यात मनिष पांडे सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्त्व करत आहे.
सध्या गुणतालिकेत कोलकाता नाइट रायडर्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर मुंबईला आजचा सामना जिंकून १४ गुणांपर्यंत पोहोचता येईल. पण कोलकाता नाइट रायडर्सच्या धावांची सरासरी मुंबईपेक्षा चांगली असल्यानं कोलकाताला प्ले-ऑफचं तिकीट मिळू शकतं.
सनरायझर्स हैदराबादसाठी आजचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिला आहे. कारण संघ केवळ ३ विजयांसह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे संघाचं आव्हान याआधीच संपुष्टात आलेलं आहे. पण असलं तरी आयपीएल्या यंदाच्या सीझनचा शेवट संघासाठी गोड करण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जिमी निशम, नेथन कुल्टर नाइल, पियुष चावला, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनिष पांडे (कर्णधार), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धीमान साहा, जेसन होल्डर, राशिद खान, मोहम्मद नबी, उमरान मलिक, सिद्धार्थ कौल
संबंधित बातमी:
RCB नाणेफेक जिंकली, विराट कोहलीच्या निर्णयानं क्वालिफायर १ ची संधी गमावली
Web Title: IPL 2021 MI vs SRH Live updates mumbai indians win toss selected bat first against sunrisers hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.