IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update : पृथ्वी शॉ ( Prithvi shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची सहजतेनं धुलाई केली. १८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. दिल्लीनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या पराभवानंतर CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं आयपीएलच्या सामन्यांच्या वेळेवरून नाराजी व्यक्त केली. सामना ७.३० वाजता सुरू होत असल्यानं प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं नुकसान होत आहे, असे त्याचे म्हणणे आहे. कॅटरिना कैफशी २ मिनिटांचं बोलणं, ही सर्वात मोठी ऑफ फिल्ड अचिव्हमेंट; विराट कोहलीचा Video Viral
शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, अंबाती रायुडू व मोईन अली यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात शिखर धवन ( ८५ धावा) व पृथ्वी शॉ ( ७२ धावा) यांनी दमदार खेळ करताना दिल्लीच्या विजयाचा मार्ग सोपा केला. KKRच्या खेळाडूच्या पत्नीसोबत राशिद खानचा सोशल वॉर; सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर तापले वातावरण!
सामन्यानंतर धोनी म्हणाला,''तुम्हाला पुढचा विचार करायला हवा. विशेषकरून दव फॅक्टरचा आणि तुम्ही प्रथम फलंदाजी करताय त्याचा. तुम्हाला १०-१५ धावा अधिक कराव्या लागतील. आधी सामने ८ वाजता सुरू व्हायचे आणि आता ७.३० वाजता. त्यामुळे अर्धा तास आधी खेळ सुरू करावा लागतो आणि तेव्हा दव कमी असतं. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चेंडू अधिक स्वींग होतो. त्यामुळे १५-२० धावा अधिकच्याच बनवायला हव्यात. त्यानंतर दुसऱ्या डावात झटपट विकेटही घ्याव्या लागतील.''
वेंकटेश प्रसादला डिवचणं पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरला महागात पडले; 'इंदिरानगरच्या गुंड्यानं' वाभाडे काढले!''खेळपट्टीवर असंच दव कमी असेल तर संघांनी २००चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळायला हवं. सुरुवातीचा अर्धा तास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि तिथेच तुम्हाला चांगली सुरुवात करायला हवी,''असे धोनी म्हणाला.
Web Title: IPL 2021: MS Dhoni ‘unhappy’ with 7.30 PM start for IPL 2021 games, terms it unfair for teams batting first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.