IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

श्रीलंका क्रिकेट संघाचा महान फिरकीपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये भर्ती..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 10:28 PM2021-04-18T22:28:10+5:302021-04-18T22:33:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Muttiah Muralitharan admitted to Apollo Hospital in Chennai due to a cardiac issue | IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

श्रीलंका क्रिकेट संघाचा महान फिरकीपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन ( Muttiah Muralitharan ) याला छातीत दुखू लागल्यानंतर चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागले होते. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार १८ एप्रिलला संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यांची टेस्ट केली गेली. मुरलीच्या हृदयात एक ब्लॉक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात त्यांच्या हृदयात स्टेंट टाकण्यात येईल.  

४९ वर्षीय मुरली हा जगातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ८०० व वन डे क्रिकेटमध्ये ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. २०११च्या वर्ल्ड कपनंतर त्यानं निवृत्ती जाहीर केली. त्यानं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोची टस्कर्स केरळ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केलं. आता ते SRHचे कोच म्हणून काम पाहत आहे.

मुरलीधरन याच्यावर अँजिओप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आला स्थीर आहे, असे अपडेट्स रात्री उशीरा मिळाले. 

Web Title: IPL 2021 : Muttiah Muralitharan admitted to Apollo Hospital in Chennai due to a cardiac issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.