IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:01 PM2021-09-07T15:01:06+5:302021-09-07T15:01:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: New Jasprit Bumrah in making? Mumbai Indians biggest fan tries to copy speedster in viral video | IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ

IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जसप्रीत बुमराहनंही इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विक्रमी कामगिरी करताना मुंबई इंडियन्सला खूश केले आहे. ओव्हल कसोटीच्या चौथ्या डावात जसप्रीतनं इंग्लंडच्या दोन फलंदाजांचे त्रिफळे उडवून बळींचे शतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात कमी २४ डावांत कसोटीत १०० विकेट्स घेणारा तो जलदगती गोलंदाज ठरला. त्यानं कपिल देव यांचा विक्रम मोडला. जसप्रीतच्या त्या यॉर्कर्सनी जगाला वेड लावले. आता आणखी एक जसप्रीत बुमराह तयार होत आहे आणि मुंबई इंडियन्सनं व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

''आम्हाला यात काहीच फरक दिसला नाही, अगदी सेम टू सेम...,'' असे मुंबई इंडियन्सनं पोस्ट केलेल्या व्हिडीओ खाली लिहिलं आहे. जसप्रीतन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ९९ सामन्यांत ११५ विकेट्स घेतल्या आहेत.    

 

आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत. मुंबई इंडियन्सचे दोन सामने दुबईत, दोन शाहजात आणि 3 अबु धाबी येथे होतील. 

Mumbai Inidian Matches Schedule  : 

19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून

मुंबई इंडियन्सचा संघ ( IPL 2021 Mumbai Indians squad) - रोहित शर्मा, अॅडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जिमी निशॅम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जासेन, मोहसीन खान, नॅथन कोल्टर नायल, पियूष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युधवीर सिंग ( Rohit Sharma (c), Adam Milne, Aditya Tare, Anmolpreet Singh, Anukul Roy, Arjun Tendulkar, Chris Lynn, Dhawal Kulkarni, Hardik Pandya, Ishan Kishan, James Neesham, Jasprit Bumrah, Jayant Yadav, Kieron Pollard, Krunal Pandya, Marco Jansen, Mohsin Khan, Nathan Coulter-Nile, Piyush Chawla, Quinton De Kock, Rahul Chahar, Saurabh Tiwary, Suryakumar Yadav, Trent Boult, Yudhvir Singh.) 

Web Title: IPL 2021: New Jasprit Bumrah in making? Mumbai Indians biggest fan tries to copy speedster in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.