Virat Kohli: टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा कर्णधार विराट कोहली यानं केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोहलीनं याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीच कोहलीला 'व्हाइट बॉल' क्रिकेटमधून कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती समोर आली आहे. कोहलीनं टी-२० आणि वनडे संघाचं कर्णधारपद सोडावं असं शास्त्री यांना हवं होतं. त्यानं कर्णधारपद सोडून आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावं असं वाटत होतं, अशी माहिती समोर आली आहे.
'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "कोहलीच्या कर्णधारपदाबाबत चर्चा तर तेव्हाच सुरू झाली होती जेव्हा भारतीय संघानं आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. आता जर ठरलेल्या योजनेनुसार गोष्टी घडल्या नाहीत तर २०२३ पूर्वीच कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुनही पायऊतार व्हावं लागेल असे संकेत आहेत"
धान्याची पोती उचलता उचलता कार्तिक घडला; जखमेवरील उपचारासाठी वडिलांनी विकली जमीन
"शास्त्री यांनी जवळपास सहा महिन्यांपूर्वीच कोहलीशी कर्णधारपद सोडण्याबाबत चर्चा केली होती. पण त्यावेळी कोहलीनं शास्त्री यांचं ऐकलं नाही. आताही कोहलीला वनडे सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व करण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यानं केवळ टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं आहे. इतकंच नव्हे, तर क्रिकेट बोर्डातही कोहलीला एक फलंदाज म्हणून कसं आणखी चांगल्या पद्धतीनं वापरलं जाऊ शकतं याबाबतही चर्चा झाली होती", असंही अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वीच टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर कोहलीनं यंदाचं आयपीएल सीझन संपलं की रॉयल चॅलेंजर्स संघाचं नेतृत्त्व देखील करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, कोहलीच्या निर्णयावर काहींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
Web Title: ipl 2021 ravi shastri suggested virat kohli to give up odi and t20i captaincy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.