दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यानं आजच्या सामन्यात अजाणतेपणानं चेंडूला थूंकी लावली. कोरोना व्हायरसमुळे आयसीसीनं गतवर्षी काही नियम बदलले होते आणि त्यानुसार खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी थूंकीचा वापर करता येणार नाही. तरीही अमित मिश्राकडून ही चूक झाली. सहाव्या षटकात तो गोलंदाजीला आला, तेव्हा त्यानं पहिला बॉल टाकण्यापूर्वी चेंडूला थूंकी लावरली. मैदानावरील अम्पायर विरेंदर शर्मा यांनी त्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला ताकिद दिली. खेळाडू पहिल्यांदा चुकला तर त्याला ताकिद दिली जाते, हीच चूक पुन्हा केल्यात संघाला ५ धावांची पेनल्टी बसते.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५) माघारी जाण्यास भाग पाडले. एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या. IPL 2021, IPL 2021 latest news, RCB Vs DC IPL Matches
Web Title: IPL 2021, RCB Vs DC T20 Live Score Update : Amit Mishra applies saliva on ball, umpire gives first warning
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.