IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो निश्चित केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:21 PM2021-05-27T12:21:52+5:302021-05-27T12:23:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Remaining Matches : Window almost finalised, but foreign players’ availability stays a big headache for BCCI | IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!

IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो निश्चित केली आहे. १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत ( UAE) खेळवण्याचा विचार सुरू आहे आणि २९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. २५०० कोटींचं नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयनं UAEत सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी या स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी अजूनही चिंतेचं वातावरण आहेच. ( Foreign Players’ availability big headache for BCCI) टेनिसपटू गॅब्रिएलाला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं नाव

सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( Caribbean Premier League ) पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या पहिल्या १० दिवसांत  वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही संकट आलं आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात होईल. भारत व इंग्लंडचे खेळाडू थेट लंडनहून यूएईत दाखल होतील. ते एका बायो-बबलमधून येणार असल्यानं त्यांना यूएईत क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण, अन्य खेळाडूंच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही. CSKच्या या 'लेडी लक'ची सोशल मीडियावर हवा; भारतीय क्रिकेटपटूशी आहे तिचं नातं!

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ( ECB) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो व अन्य इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याकालावधीत इंग्लंडचा संघ बांगलादेश व पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. न्यूझीलंडचे खेळाडूही पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नेदरलँड्स संघाविरुद्धच्या मालिकेसाठी व्यग्र असणार आहेत. IPL 2021 Remaining Matches : आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान, विंडीज बोर्डाची साथ!

CPL 2021चे पर्व २८ ऑगस्ट व १९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विंडीज खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल.  

  • इंग्लंड - बांगलादेश दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्याची मालिका 
  • कोणते खेळाडू मुकणार - मोईन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, सॅम बिलिंग, डेविड मलान, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टो.
  • न्यूझीलंड - न्यूझीलंड यूएईत पाकिस्तानविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार 
  • कोणते खेळाडू मुकणार - केन विलियम्सन, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टीम सेईफर्ट, फिन अॅलन, कायले जेमिन्सन 
  • ऑस्ट्रेलिया - श्रीलंकेविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन
  • कोणते खेळाडू मुकणार - ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, स्टीव स्मिथ, रिले मेरेडीथ, नॅथन कोल्टर नील. केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, डॅन ख्रिस्टियन, ख्रिस लीन, अँड्य्रू टाय, बेन कटींग, जेसन बेहरेनडॉर्फ, मोईसेस हेन्रीक्स, अॅडन झम्पा.
  • दक्षिण आफ्रिका - नेदरलँड्स यांच्याविरुद्धची मालिका, त्यानंतर काही खेळाडू CPL 2021त खेळणार 
  • कोणते खेळाडू मुकणार - क्विंटन डी कॉक, फॅफ ड्यू प्लेसि, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, अॅनरिच नॉर्ट्जे, ख्रिस मॉरिस, डेव्हिल मिलर, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सेन 
  • बांगलादेश - शाकिब अल हसन, मुस्ताफिजुर रहमाना  
  • वेस्ट इंडिज - किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शिमरोन हेटमायर, सुनील नरीन, फॅबियन अॅलेन, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर
     

Web Title: IPL 2021 Remaining Matches : Window almost finalised, but foreign players’ availability stays a big headache for BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.