IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

ग्लेन मॅक्सवेल आणि कायले जेमिन्सन या खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आयपीएल लिलावात ( IPL 2021 Auction) RCBनं धुरळा उडवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:02 AM2021-03-11T10:02:54+5:302021-03-11T10:03:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Royal Challengers Bangalore sign Finn Allen as replacement for Josh Philippe | IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ग्लेन मॅक्सवेल आणि कायले जेमिन्सन या खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आयपीएल लिलावात ( IPL 2021 Auction) धुरळा उडवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप ( Josh Philippe) यान इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून RCBन न्यूझीलंडचा उद्योन्मुख खेळाडू फिन एलन ( Finn Allen) याला करारबद्ध केलं आहे. एलनला आयपीएल लिलावात कुणीच खरेदी केले नाही. २० लाख ही त्याची बेस प्राईज होती. रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

जोश फिलिपनं माघार घेतल्यानंतर RCBनं ट्विट केलं की,''जोश फिलिपनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगताना आम्हाला दुःख होतेय. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आघाडीचा फलंदाज फिन एलन याला करारबद्ध केले आहे.'' ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिपनं २०२०च्या आयपीएल पर्वातून पदार्पण केलं आणि पाच सामन्यांत त्यानं ७८ धावा केल्या. तेच फिन एलननं न्यूझीलंडकडून १२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे.  


२१ वर्षीय एलनं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश लीगमध्ये ५१२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यानं ५६ चौकार व २५ षटकार खेचले आहेत.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख

Web Title: IPL 2021: Royal Challengers Bangalore sign Finn Allen as replacement for Josh Philippe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.