IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचे ( RR) प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या संजू सॅमसननं युवा ब्रिगेड मैदानावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानं चेतन सकारियाकडून पहिले षटक टाकून घेतले. त्यानं तिसऱ्या षटकात मयांक अग्रवालला बाद करून PBKS ला मोठा धक्का दिला. पण, त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करून पंजाबचा डाव सावरला. लोकेशला दिलेलं दोन जीवदान RRला महागात पडले. लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले. पण, दीपक हुडानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये २३हून कमी चेंडूंत दोन अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच अनकॅप खेळाडू ठरला. त्यानं २०१५मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update
लोकेश राहुलला दोन जीवदान RRला महागात पडणार
सौराष्ट्रच्या चेतन सकारीयानं राजस्थान रॉयल्ससाठी पहिलं षटक फेकलं. पदार्पण करणाऱ्या मुश्ताफिजूर रहमान यानं टाकलेल्या दुसऱ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( KL Rahul) पायचीत असल्याची अपील झाली. DRS घेऊ की नको यासाठी थोडीचर्चा झाली, परंतु कर्णधार संजू सॅमसननं DRS घेतला नाही. त्यानंतर रिप्लेत लोकेश बाद असल्याचे दिसत होते आणि ही चूक राजस्थानला महागात पडू शकते. पण, चेतन सकारियानं ( Chetan Sakariya) तिसऱ्या षटकात पंजाबला धक्का दिला. त्यानं मयांक अग्रवालला ( १४) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. ७व्या षटकात बेन स्टोक्सनं लोकेश राहुलचा झेल सोडला. ipl 2021 t20 RR vs PBKS live match score updates Mumbai
३५० षटकारांचा विक्रम अन् ४१ वर्षीय गेलची फटकेबाजीराहुल टेवाटियानंही त्याच्याच गोलंदाजीवर गेलचा झेल सोडला. गेलनं या सामन्यात मोठा विक्रम केला आहे आणि आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. गेलनं आयपीएलमध्ये ३५० षटकारांचा विक्रम केला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २३७), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २१४), विराट कोहली ( २०१) यांचा क्रमांक येतो. रियान परागनं ( Riyan Parag) १०व्या षटकात गेलला माघारी जाण्यास भाग पाडले. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला. गेल व राहुलची ४५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update
वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट
राहुलनं संधीचं सोनं करताना ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. गेल माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन येणं अपेक्षित होतं, पंरतु PBKS नं स्ट्रॅटेजी बदलली अन् दीपक हुडाला ( Deepak Hooda) पुढे पाठवले आणि त्यानं षटकारांची आतषबाजी करताना हा निर्णय योग्य ठरवला. ४० धावांवर असताना जोस बटलरनं दीपकला जीवदान दिलं. पंजाबनं १५ षटकांत २ बाद १६१ धावा चोपून दोनशेपारच्या दिशेनं पाऊल टाकले.
Web Title: IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Deepak Hooda becomes the first uncapped players to smash half century in less than 23 balls twice in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.