१४वी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही त्यांच्या सरकारकडून मायदेशात येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पण, यात ऑस्ट्रेलियन खेळाडू व स्टाफ यांची मोठी कोंडी झाली आहे. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानसेवा ऑस्ट्रेलियन सरकारनं रद्द केल्या आहेत. त्यामुळे घरी जायचं तर कसं हा प्रश्न त्यांना सतावत आहे. अशात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार आहेत. मुंबई इंडियन्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.
मुंबई इंडियन्सचा नाद खुळा... ( Mumbai Indians to Send all Players by Chartered Flight)
८ फ्रँचायझींपैकी फक्त मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी त्यांच्या परदेशी खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्समध्ये मायेदेशात पाठवणार आहेत. त्यांचे हे चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व्हाया दक्षिण आफ्रिका या मार्गे जातील. त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले होते. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट, अॅडम मिलने, जेम्स निशॅम, शेन बाँड ही न्यूझीलंडच्या खेळाडू आहेत. एक चार्टर्ड फ्लाईट किरॉन पोलार्डला घेऊन त्रिनिदादकडे रवाना होणार आहे. त्याच विमानातून आफ्रिकन खेळाडू क्विंटन डी कॉक व मार्को जॅन्सेन हेही आहेत. येत्या २४ ते ४८ तासांत ही विमानं त्या त्या ठिकाणी रवाना होतील.
सनरायझर्स हैदराबद टेंशनमध्ये
सनरायझर्स हैदराबादला अद्याप फ्लाईट शेड्युल्ड ठरवता आलेलं नाही. ''आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, परंतु अद्याप स्पष्टता मिळालेली नाही, असे SRHच्या मॅनेजरनं सांगितले. त्यांनी Go Air विमान बूक केलं, परंतु बार्बाडोजसाठी ते जाऊ शकत नाही.
बीसीसीआयची विविध बोर्डांशी चर्चा ( BCCI Working With Multiple Boards)
बीसीसीआय अनेक आंतरराष्ट्रीय बोर्डांशी चर्चा करत आहे. ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी असल्यानं ऑस्ट्रेलिय खेळाडूंना मालदीव्स किंवा श्रीलंकेत पाठवण्याची तयारी सुरू आहे.
स्थानिक खेळाडूंसाठी दोन चार्टर्ड फ्लाईट्स...
आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या भारतीय खेळाडूंना घरी पोहोचवण्यासाठी अहमदाबाद येथून दोन चार्टर्ड फ्लाईट्सची सोय केली आहे आणि एक विमान चेन्नई आणि बंगळुरूला जाईल, तर दुसरं नवी दिल्लीला जाईल.
Web Title: IPL 2021 Suspended: Mumbai Indians arrange multiple chartered flights to send back their players; offers help to other franchises too
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.