IPL 2021 Suspended : डॅडी लवकर घरी या, आम्ही तुम्हाला मिस करतोय!; डेव्हिड वॉर्नरच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!

IPL 2021 Suspended : David Warner Daughter आयपीएल सामना खेळताना डेव्हिड वॉर्नरच्या बुटांवर त्याच्या तीन मुली इव्ही, इंडी व इस्ला यांच्यासह पत्नी कँडी यांचे नाव लिहिले पाहायला मिळाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:10 PM2021-05-04T16:10:44+5:302021-05-04T16:12:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Suspended : Please Daddy come home straight away; David Warner's daughters missing their daddy, her post goes viral | IPL 2021 Suspended : डॅडी लवकर घरी या, आम्ही तुम्हाला मिस करतोय!; डेव्हिड वॉर्नरच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!

IPL 2021 Suspended : डॅडी लवकर घरी या, आम्ही तुम्हाला मिस करतोय!; डेव्हिड वॉर्नरच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Suspended : वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा.. हे एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले अन् बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यात बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी दिली आहे. पण, परदेशी खेळाडूंनी घरी जायचं कसं, असा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे. बीसीसीआयनं त्यांना सुरक्षित पोहोचवण्याची सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. पण, भारतातील कोरोना परिस्थिती पाहता खेळाडूंमध्येच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे दिसत आहे.  आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!

आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला अन् डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याची मुलगी इव्हीनं फॅमिली फोटो काढला आहे आणि त्यावर वॉर्नरसाठी एक मॅसेज लिहिला आहे. डॅडी कृपयाकरून लवकर घरी या. आम्हाला तुमची खूप आठवण येतेय आणि लव्ह यू.. इव्ही, इंडी व इस्लाकडून खूप खूप प्रेम..  लोकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड करायची नव्हती; बीसीसीआय सचिव जय शाह

आयपीएलमध्ये सामना खेळताना डेव्हिड वॉर्नरच्या बुटांवर त्याच्या तीन मुली इव्ही, इंडी व इस्ला यांच्यासह पत्नी कँडी यांचे नाव लिहिले पाहायला मिळाले. 


डेव्हिड वॉर्नरचे कर्णधारपद गेलं अन् अंतिम ११तील स्थानही गमावलं...
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६मध्ये सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले. त्याशिवाय अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. २०२१च्या सहा सामन्यांतील खराब निकालामुळे त्याच्याकडून प्रथम कर्णधारपद काढून घेतले गेले आणि त्याला राजस्थान रॉयल्सच्या अंतिम ११मध्येही स्थान दिले गेले नाही. त्यामुळे तो निराश दिसला होता. आयपीएलमधील सर्व खेळाडूंना घरी परतण्याची BCCIनं दिली परवानगी, आता पुढे काय?

सनरायझर्स हैदराबादकडून सर्वाधिक ४०१२ धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. SRHसाठी सर्वाधिक १४३ षटकार, सर्वाधिक ५०.७८ची सरासरी, सर्वाधिक ५०+ धावा ( ४२) हे विक्रमही वॉर्नरनं केले आहेत. आयपीएलच्या एकाच पर्वात ८४८ धावा, आयपीएलमध्ये सर्वाधिक ५४४७ धावा करणारा परदेशी खेळाडू, आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० + ( ५४) धावा अन् अर्धशतकांचे अर्धशतक साजरा करणारा एकमेव फलंदाज, शिवाय २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९ व २०२० वर्षी सर्वाधिक धावांचा विक्रमासह ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू...

Web Title: IPL 2021 Suspended : Please Daddy come home straight away; David Warner's daughters missing their daddy, her post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.