IPL 2021 suspended : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी तयार केलेला बायो बबल कोरोना व्हायरसनं भेदला अन् एकामागून एक संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडू लागले. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा अन् चेन्नई सुपर किंग्समधील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात मंगळवारी CSKचा फलंदाज प्रशिक्षक मायकल हसी ( Michael Hussey) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. पण, हसीच्या रिपोर्टमुळे CSKच्या गोटातही प्रचंड तणावाचे वातावरण आहे. Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान!
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मायकल हसी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नईच्या संघात याआधीच गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला होता. बायो-बबलच्या नियमांचा पालन करुनही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं (बीसीसीआय) खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचा निर्णय काल जाहीर केला. दरम्यान, स्पर्धा रद्द झाली असली तरी परदेशी खेळाडूंमध्ये मायदेशात परतण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात भारतातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. IPL 2021 : टीम इंडियाचं भविष्य उज्ज्वल; या युवा खेळाडूंनी भल्याभल्या दिग्गजांना पाजलं पाणी!
कोरोना अहवाल येण्याच्या २-३ दिवसांपूर्वी हसीनं CSKच्या सराव सत्रात सहभाग घेतला होता आणि तो फॅफ ड्यू प्लेसिस व सुरेश रैना यांच्यासोबत चर्चा करताना दिसल्याची माहिती CSKच्या सदस्यानं दिली आहे. ''कोरोना रिपोर्ट येण्याच्या 2-3 दिवस आधी हसीनं सराव सत्रात सहभाग घेतला होता. तो सर्वांमध्ये मिसळला होता. मी स्वतः त्याला फॅफ ड्यू प्लेसिस व सुरेश रैना यांच्यासोबत 15 ते 20 मिनिटे बोलताना पाहिले. त्यानं अऩ्य खेळाडूंसोबतही वेळ घालवला,''असे CSKच्या एका सदस्यानं InsideSport.co ला सांगितले.
सुरेश रैनाचं ट्विट...
''हा मस्करीचा विषय नाही! अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत आणि यापूर्वी आयुष्यात एवढा हतबल कधी झालो नाही. आपल्याला किती मदत करायची आहे, हे महत्त्वाचे नाही, परंतु आता संसाधनेच अपुरे पडत आहेत. एकमेकांना मदत करून जीव वाचवणाऱ्या प्रत्येक भारतीय सॅल्यूटचा हकदार आहे.''
Web Title: IPL 2021 Suspended: ‘Saw Hussey chatting with Du Plessis and Raina,’ more CSK players could test positive for COVID-19
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.